सात बारा.jpg 
नाशिक

सातबारा उतारा आता नव्या रुपात...वाचण्याची, नोंदीची पध्दतही बदलणार!...जाणून घ्या नवे बदल..

विक्रांत मते

नाशिक : जमीन मालकांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला व जमिनीचा लेखा-जोखा असलेला सातबारा उतारा आता नव्या स्वरुपात येणार असून राज्य शासनाच्या महसुल विभागाने सिटी सर्व्हे कार्यालयामार्फत सेवा निवृत्त झालेल्या अधिकायऱ्यांचे अभिप्राय मागविले आहे. त्यानुसार आता सातबारा वाचताना नवीन नियम जाणून घेणे महत्वाचे ठरणार असून फसवणुकी होऊ नये म्हणून विशेषत: शेतकऱ्यांना या बदलाची माहिती होणं आवश्यक  ठरणार आहे.

नवीन बदल सातबारा उताऱ्यावर दिसणार

ब्रिटीश काळापासून जमीनीचा लेखाजोखा मांडण्यासाठी सात बारा उतारा ही पध्दत राबविली जाते. जमिनीचा इतिहास, मोजमाप व जमिनीसंदर्भातील व्यवहाराचे साधारण पंधरा ते सतरा नमुने आहेत. परंतू सर्वसामान्यांसाठी सात व बारा क्रमांकाचा नमुना हाच महत्वाचा ठरत असल्याने सातबारा उतायाला महत्व आहे. एकाच कागदावर नमुना क्रमांक सात व त्याखाली बारा क्रमांकाचा नमुना असतो. दोन्ही नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर जमिनीचे व्यवहार निश्‍चित केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून सातबारा उतारा वाचण्याची व खरेदी-विक्री तसेच जमिनी संदर्भात झालेले फेरफार नोंदविण्याची व वाचण्याची एकच पध्दत रुढ होती. आता शासनाने ऑगस्ट 2020 पासून वाचण्याच्या पध्दतीत बदल केला आहे. पुढील महिन्यात नवीन बदल सातबारा उताऱ्यावर दिसणार आहे. 

सात-बारा उताऱ्यावरील बदल 

खाते क्रमांक आता खातेदार किंवा खातेदारांच्या नावाबरोबर नमूद केला जाणार आहे. शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर व बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे. मयत खातेदार किंवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्जबोजाच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. मात्र आता कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविली जाणार आहे. अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झालेल्या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर १२ ची आवश्यकता नाही. अशी सूचना छापली जाईल. नमुना ७ वर नोंदवलेले परंतु प्रलंबित असलेले फेरफार इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र दर्शविले जातील. 

स्वतंत्र गाव नमुन्यात बदल

गावाच्या नावासोबत लोकल गर्व्हमेन्ट डिरेक्‍टरी कोड असेल. लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविले जाईल. नमुना ७ वर नोंदविलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकाण्याचे खाली शेवटच्चा रकान्यात तर सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रित दर्शविले जाणार आहेत. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल केले जणार आहेत. 

पोट खराबा दुरुस्ती 

आतापर्यंत पोटखराबा म्हणून नोंद असलेले क्षेत्र लागवडी खाली आणले मात्र त्याची नोंद नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हते. शासनाला देखील कर आकारणी करता येत नसल्याने सातबारा उताऱ्यावर पोट खराबा दुरुस्ती करून उतारा बदलासंदर्भात पहिले पाऊल शासनाने टाकले आहे. 

संपादन - किशोरी वाघ


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT