Chief Minister Eknath Shinde while interacting with the accident patients at Yashwant Hospital through video conference.
Chief Minister Eknath Shinde while interacting with the accident patients at Yashwant Hospital through video conference. esakal
नाशिक

Shirdi Bus Accident : CM शिंदेंचा व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णांशी थेट संवाद; जखमींना 20 लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : नाशिक-शिर्डी महामार्गावर १३ जानेवारीला पाथरे गावाजवळ खासगी बसच्या अपघातात दहा साईभक्त ठार झाले होते, तर २३ ते २५ हे भाविक जखमी झाल्याने त्यांना सिन्नर येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यातच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. जखमी व्यक्तींवरील उपचारांचा खर्च सरकार करणार असून, या अपघाताची चौकशी करण्याचे आदेशही शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते.

त्या अनुषंगाने सिन्नर शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांनी सिन्नर येथे येत त्यांना आपल्या गावी सुरक्षित पाठवले. याशिवाय जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने बुधवारी मुख्यमंत्री सहायता निधी विभागाने यशवंत हॉस्पिटलला भेट देत उपचारांसाठी राज्य सरकारचा २० लाखांचा निधी दिला. (Shirdi Bus Accident CM eknath Shinde direct interaction with patients through video call 20 lakhs assistance to injured nashik news)

नुकतीच मुख्यमंत्री सहाय्यता निधी येथील अधिकाऱ्यांनी सिन्नर शहरातील यशवंत हॉस्पिटल येथे भेट देत रुग्णांची विचारपूस करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची व्हिडिओ मोबाईलद्वारे थेट मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला.

यावेळी विविध रुग्णांची त्यांनी वार्तालाप करीत अपघाताबद्दल माहिती घेतली तसेच उपचाराविषयी जी काही अजून मदत लागेल ती पूर्ण करू, अशी शाश्वती दिली. अपघातातील रुग्णांना जी काही मदत मिळालेली असून त्यामुळे गंभीर जखमी रुग्णांवरील शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

या अपघातात दहा भाविकांचा मृत्यू झाला, तर २३ जण जखमी झाले. या जखमी व्यक्तींवर सिन्नर शहरातील तीन खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. उपचारांवरील खर्च राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना हॉस्पिटल्समधून डिस्चार्ज देण्यात आला.

मंगळवारपर्यंत उपचार खर्च मिळू न शकल्याने काही रुग्णांवरील शस्त्रक्रिया रखडल्या. जिल्हाधिकारी गंगाथरन. डी. यांनी मंगळवारी याबाबत तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून प्रधान सचिव तथा न्यायासाचे सदस्य महासचिव विकास खारगे व कैलास बिलोनीकर सहसचिव यांच्याशी पाठपुरावा केला.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य दंडाधिकारी मंगेश चिवटे यांनी याबाबतचे पत्र बुधवारी यशवंत हॉस्पिटलकडे सुपूर्द केले. मुख्यमंत्र्यांनी शासकीय निधीतून उपचारांची घोषणा केली होती.

तथापि, निधी मंजूर झालेला नसल्याने शस्त्रक्रीया करण्यात अडथळा निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांनी सहाय्यता निधीतून ७० लाखांचा निधी मंजूर केला. उपचारांसाठी मंजूर २० लाखांचा निधी गुरुवारी जमा होणार आहे.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार एकनाथ बंगाळे, मंडल अधिकारी माणिक गाडे, तलाठी आकाश हांडे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे माऊली धुंळगंडे, गजानन नारलावर, डॉ. प्रथमेश पाटील, नाशिकचे योगेश म्हस्के, डॉ. संदीप मोरे, डॉ. अमोल मोरे, शिवाजी भोर, संजय सानप, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख शरद शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांकडून वाजेंचे कौतुक

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी रुग्णांना घरातून जेवणाचे डबे पुरविले. तसेच नातेवाईकांची मुक्कामाची संपर्क कार्यालयात व्यवस्था केली. तसेच डॉ. संदीप मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर वेळेत व योग्य पध्दतीने उपचार केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT