नाशिक : शहरातील कोरोनाविरोधातील लढ्याला चार दिवसांत राजकीय पक्षांकडून मिळालेल्या ताकदीमुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत आहे. विविध भागांत शुक्रवारी (ता.२४) भारतीय जनता पक्षाने एक हजार ५९२ नागरिकांची तपासणी केली. त्यात तब्बल १६१ नागरिक पॉझिटिव्ह आढळले. शिवसेनेच्या शिबिरात १६८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ३२ पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाला दोन्ही प्रमुख पक्षांची मदत झाली आहे.
राजकीय पक्षांच्या ताकदीमुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सात हजार रुग्णांचा टप्पा गाठण्याची स्थिती आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून तपासण्या केल्या जात होत्या. साडेतीन महिन्यांपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी थकल्याची बाब प्रकर्षाने समोर येत होती. वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरे भरविणाऱ्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त झाल्यानंतर चार दिवसांपासून भाजप व शिवसेनेने मोहीम हाती घेत रॅपिड अँन्टिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत.
शिवसेनेची विविध ठिकाणी शिबिरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने आरोग्य पंधरवडा जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभाग सातमध्ये ७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातील एक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. प्रभाग २५ मध्ये ९० तपासण्या करण्यात आल्या, त्यात ३१ पॉझिटिव्ह आढळले. शिवसेनेकडून विनामूल्य तपासणी केली जात आहे. प्रभाग १९ मध्ये नगरसेविका जयश्री खर्जुल, प्रभाग २१ मध्ये नगरसेवक रमेश धोंगडे, प्रभाग २२ मध्ये केशव पोरजे, प्रभाग ३१ मध्ये सुदाम डेमसे यांनी आरोग्य शिबिर घेतले.
हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा
भाजपच्या मोहिमेत १६१ पॉझिटिव्ह
भाजपने विविध भागांत फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तपासणी केली. त्याची आकडेवारी अशी (कंसात कोरोनाबाधित) : नाशिक रोड येथील सिन्नर फाटा ९५ (८), देवळालीगाव ३० (१), बुद्धविहार ६८ (३), गुलाबवाडी १०९ (१०), हमालवाडी ८३ (६), हिरावाडी ४२ (६), फुलेनगर १२७ (३), संजयनगर १६० (१२), जेल रोड येथील मंगलमूर्तीनगर ८४ (२), दसक-पंचक १२४ (५), समतानगर, टाकळी ९८ (१५), रामवाडी आदर्शनगर १३० (३६), खुटवडनगर ९५ (१४), राणा प्रताप चौक १२६ (२४), वडाळा येथील रामोशी मळा ३० (०), अंबड येथील दत्तनगर ५५ (५), विडी कामगार वसाहत १३६ (११)
(संपादन - किशोरी वाघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.