नाशिक : (सिन्नर) वेळ रात्री साडेअकराची...कामासाठी फिरोज खान व अन्वर खान मुंबईकडे निघाले. निमोणमार्गे नांदूरशिंगोटे बायपासने पुणे महामार्गावरून नाशिककडे जात होते. बोलता - बोलता वेळही पुढे सरकत होती. इतक्यात दोन दुचाकी ओव्हरटेक करुन समोरच उभ्या झाल्या. अन् नंतर जे घडले ते धक्कादायक होते.
अशी घडली घटना
शुक्रवारी (ता.४) रात्री साडेअकराला नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर धक्कादायक घटना घडली. संगीता गणेश सोनवणे (रा. रांजणगाव देशमुख) यांच्या पोल्ट्री फार्म येथून फिरोज खान व अन्वर खान (रा. मुंबई) यांनी पिक-अप (एमएच ०४ जेके १४४८) मध्ये ८०० कोंबड्या भरून मुंबईकडे रवाना झाले. निमोणमार्गे नांदूरशिंगोटे बायपासने पुणे महामार्गावरून नाशिककडे जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी रात्रीच्या सुमारास त्यांची पिक-अप अडवत चालकाला चाकूचा धाक दाखवत गाडी वावी रस्त्याकडे आणण्यास सांगितली. काही अंतर आत गेल्यानंतर चौघांनी चालक व क्लिनर यांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडून ६०० कोंबड्या व मोबाईल काढून घेतला. यानंतर चालकास पुणे महामार्गकडे जायला भाग पाडत, कुठे थांबला, तर तुझा मुडदा पाडू, अशी धमकी देत शिंदे टोलनाक्यापर्यंत त्यांचा पाठलाग केला. घाबरलेल्या चालकाने कुठेही न थांबता मुंबई गाठत संपूर्ण प्रकार मालकाला सांगितल्यानंतर शनिवारी (ता.५) मुंबईवरून तक्रारदार आणि मालकाने वावी पोलिस ठाणे गाठत चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली.
चोरटे लवकरच जाळ्यात...
चोरीचा प्रकार व घटनाक्रमावरून माग काढला असता पोलिसांच्या हातात सबळ माहिती आली आहे. संशयित लवकरच ताब्यात घेतले जातील व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला जाईल. - रणजित गलांडे (सहाय्यक पोलिस निरीक्षक, वावी)
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.