Nikhil Shewale and village council members cleaning the area of ​​Rokdoba temple in Dabhadi. esakal
नाशिक

Nashik News: दर्शनासाठी आलेल्या नवरदेवाकडून श्रमदान! राज्य सरकारच्या स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य सरकारने स्वच्छता सेवा उपक्रमास सुरवात केली आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषद व येथील पंचायत समितीतर्फे तालुक्यात स्वच्छता श्रमदान शिबिर मोहीम राबविली जात आहे.

तालुक्यातील रोकडोबानगर येथील मंदिरात दर्शनासाठी आलेल्या नवरदेवाने मंदिर परिसरात स्वतःहून भाग घेत स्वच्छता केली. या केलेल्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. (Shramdon from the bridegroom who came for darshan Participated in cleanliness drive of state government Nashik News)

दाभाडी (ता.मालेगाव) येथील रोकडोबा हनुमान मंदिरात पाटणे येथील निखिल शेवाळे हा नवरदेव धार्मिक विधी व दर्शनासाठी आला होता. मंदिर परिसरात दाभाडी ग्रामपालिका तर्फे स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांचा निदर्शनास आले.

शेवाळे याने स्वयंपूर्तीने अंगात नवरदेवाचा साज असतानाही स्वतः झाडू घेऊन साफसफाई केली. शेवाळेची साफ सफाई बघून परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ही स्वच्छता करायला सुरवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी निखिल म्हणाला, की स्वच्छता ही काळाची गरज आहे. स्वछता केल्यास नेहमीच रोगराईचा नायनाट होतो.

येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत वेन्दे यांनी अभिनंदन करून त्यास लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, बी. एन. पाटील, नाशिक जिल्हा परिषदेचे रवींद्र बराथे, ललित शेलार, मोहन वाघ, मयूर पाटील, दीप गायकवाड आदीसह भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT