shriram janmotsav at panchavati  Esakal
नाशिक

आजचा श्रीराम जन्मोत्सव बंद दाराआडच

सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

सकाऴ वृत्तसेवा

पंचवटी (नाशिक) : शहरासह जिल्हाभरात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने प्रशासन पुरते धास्तावले आहे. त्यामुळे राज्यभरातील धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांचे आराध्यदैवत असलेला श्रीराम जन्मोत्सवही बुधवारी (ता. २१) निवडक विश्‍वस्त व पुजारीवर्गाच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याशिवाय कामदा एकादशीचे औचित्य साधत काढण्यात येणारा व नाशिकचे वैशिष्ठ्य ठरलेला श्रीराम व गरुड रथोत्सवासह सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

प्रभू श्रीराम अन्‌ नाशिक त्यातल्या त्यात पंचवटीचे एक आगळेवेगळे नाते. प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांची काळ्या पाषाणातील एकमेव मूर्ती म्हणून या मंदिराची देशभर महती आहे. त्यामुळे याठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. देवस्थानतर्फे गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे हे सर्व कार्यक्रमच रद्द करण्यात आल्याचे विश्‍वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले.

बुधवारी (ता. २१) पहाटे काकड आरती झाल्यावर श्रीरामांची महापूजा झाली, की दुपारी बाराला निवडकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव पार पडेल. त्यानंतर दिवसभर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. यानिमित्त होणारा रथोत्सव (ता. २३) रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी केवळ मंदिराच्या आवारात ‘श्रीं’चा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मंदिराची साफसफाई

वासंतिक नवरात्रोत्सव व त्यानिमित्त होणारा जन्मोत्सव सोहळा रद्द केला असला तरी मंगळवारी (ता. २०) नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली. तसेच, मंदिरावर विद्युत रोषणाईही करण्यात येणार आहे. यंदाचे पुजेचे मानकरी विलासबुवा पुजारी आहेत. पहाटे धनंजय पुजारी यांच्या हस्ते काकड आरती होईल. सायंकाळी सातला अन्नकोट व आठच्या सुमारास नरेशबुवा पुजारी यांच्या हस्ते शेजारती करण्यात येईल. जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT