Bride Rituja and groom Prasad accepting gifts from Shyam Mogul.  esakal
नाशिक

Nashik Wedding Gift : लग्नापेक्षा होत होती आहेराचीच चर्चा! मित्राच्या मुलीला दिला 'हा' अनोखा आहेर...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Wedding Gift : मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर प्रेरित १९ एकर विषमुक्त शेती करणारे श्याम सीताराम मोगल यांच्याकडून आपला मित्र श्याम चिमणराव काठे यांची मुलगी ऋतुजा हिस अनोखा आहेर देऊन सर्वच उपस्थितांचे लक्ष वेधले.

त्यामुळे लग्नापेक्षा आहेराचीच चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. (Shyam Mogul give unique wedding gift to friends daughter on wedding nashik news)

या विवाह सोहळ्याला मौजे सुकेणे चक्रधर स्वामी मंदिराचे संचालक महंत सुकेणेकर महाराज, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, माजी आमदार अनिल कदम, आमदार सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, त्र्यंबकेश्वरचे संजय जाधव, अशोक दुधारे, दत्तामामा कळमकर, धावपटू कविता राऊत, डॉ. संदीप पानगव्हाणे, गोरख जाधव, डॉ. सुनील मोरे, बाळासाहेब कानडे, मोनिका आथरे, शकुंतला वाघ आदी उपस्थित होते, त्यांनी या अनोख्या आहेराचे कौतुक केले. संपूर्ण विवाह मंडपात लग्नापेक्षा आहेराचीच चर्चा दिसून येत होती

"आधुनिक काळामध्ये बदलत्या जीवन पद्धतीत विषमुक्त शेतीची आवश्यकता निर्माण झाली असून समाजाला या गोष्टींकडे पुन्हा वळविण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे." - श्याम मोगल, मौजे सुकेणे, विषमुक्त शेतीप्रयोग शेतकरी.

"माझ्या वडिलांचे मित्र, माझे काका श्याम मोगल यांनी मला आहेरासाठी दिलेली भेट अनोखी असून ती मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. त्यांची भेट मला नेहमीच प्रेरणादायी ठरेल." -ऋतुजा, नववधू.

गंगापूरजवळील बालाजी लॉन्स येथे ऋतुजा व प्रसाद यांचा विवाह झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विवाहाप्रसंगी मौजे सुकेणे येथील श्याम मोगल यांनी आहेरासाठी अनोखा गाय गोठा उभारून त्यात देशी गीरगायीसह वडापासून ते तुळशीपर्यंत सर्व देशी झाडे, श्रीमद्भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी हे भागवत ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर व लोकमान्य टिळक यांचे चरित्र ग्रंथ,

२१ प्रकारच्या देशी गावरान जातीची वेगवेगळे बियाणे, २१ विषमुक्त प्रकारच्या फळभाज्या, विषमुक्त २१ किलो गहू, विषमुक्त २१ किलो कांदे, विषमुक्त २१ किलो ज्वारी, विषमुक्त ११ किलो गव्हाच्या शेवया, विषमुक्त देशी गाईचे एक किलो तूप, विषमुक्त ४ डझन केळी, याशिवाय चूल, जाते, पाटा- वरवंटा, उखळ-मुसळ, रांजण, खुरपे, दोन किलो विषमुक्त काळे मनुके व अग्निहोत्रचे एक पात्र इत्यादी वस्तू आहेर स्वरूपात ऋतुजा व प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT