Erand News
Erand News esakal
नाशिक

Nashik News : बहुमूल्य औषधी एरंडाची शेती कसमादे पट्ट्यात नामशेष

प्रभाकर बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

येसगाव : होळी आली की एरंडाच्या झाडाची आठवण येते. माघ पौर्णिमेला होळीचा दांडा हा एरंडाच्या झाडाचा असतो. एरंडाचे फांद्या होळीत टाकण्याची प्रथा आहे.

होळी आता ग्रामीण तसेच शहरी भागात चौकाचौकात होत असल्यामुळे सर्वत्र एरंड झाडाचा दांड्या, फांद्या, होळीत टाकल्या जातात. त्यामुळे दरवर्षी एरंडाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते. झाडे तोडल्याने किमान सरासरी साडेआठ ते नऊ हजार हेक्टर वरील एरंडाची झाडे नष्ट होतात.

एरंडाचे झाडे वर्षायू किंवा बहु वर्षायू आहे. त्यामुळे एक झाड तीन-चार वर्ष त्या ठिकाणी सहज दिसते. घरा शेजारी, शेताच्या बांधावर,रस्त्याच्या कडेने एरंडाची झाडे लागवडी शिवाय वाढलेली आढळतात. झाडाच्या मंजिरीला बोंडे लागतात.बोंडे तोडले नाही तर ते वाळल्याने उन्हाने तडकून बिया खाली पडतात. (Slaughter of trees on nine thousand hectares on occasion of Holi Cultivation of the valuable medicinal castor is extinct in Kasmanda belt Nashik News)

पावसाळ्यात उगवतात. एका काटेरी बोंडात तीन प्रकारचे वेगवेगळ्या रंगाच्या ठिपके असलेल्या बिया आढळतात. एरंडाचे सर्व भाग उपयोगी आहेत. बिया, फुले, साल, मुळे, लाकूड, पाने यांच्यात सर्व औषधी गुणधर्म आहेत. शेतकरी एरंडाचा झाडाचा उपयोग शेतात फक्त कीटकनाशक म्हणून मिरची, वांगी, पपईच्या चहूबाजूने एरंडाचे झाड लावले जातात.

झाडावर वेल वर्गीय चौधारी शेंगा, पावटा हिरवा किंवा तपकिरी, (वाल) खाण्याच्या काज कुयऱ्या वाढून शेंगा घेतात. व्यापारी दृष्ट्या कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे कसमादे पट्ट्या औषधी एरंड पिकाची शेती दिसत नाही.

तालुक्यात काही वर्षांपूर्वी गावांमध्ये एरंड पिकाची शेती होती. मात्र हीच शेती आता नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. परिसरात एरंड्याची हिरव्या किंवा लाल दांड्याची झाडे आढळतात. काही झाडांना लाल पाने व लाल गुच्छ लागल्याने घराजवळ शोभा म्हणूनी झाडाची लागवड करतात.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

एरंडात औषधी गुणधर्म

तज्ज्ञांच्या मते मूळ हे दाहक वाटनाशक आहे. दमा, सूज, कफ, आतड्यांच्या आजार तसेच पानाचा काढा दुग्धवर्धक आहे. तेल रेचक म्हणून हत्तीरोग व आकडी यावरही गुणकारी आहे. विमानात यंत्रात वंगण म्हणून वापरतात. साबण, मेणबत्ती, तेल, कापूस रंगविणे, छपाई, नायलॉन धागे बनविणे, कातड्याच्या उद्योगधंद्यास वापरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT