Sewage flowing in front of citizens houses in Mahatma Phule Chowk area esakal
नाशिक

NMC News : ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : राजरत्न भागातील महात्मा फुले चौक भागात गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या (Blocked) ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरासमोरूनच वाहत आहे. (smelly water of blocked drainage is flowing right in front of citizens house citizen complain to nmc nashik news)

याबाबत मनपा प्रशासनास वेळोवेळी तक्रार करूनही कोणीही तक्रार सोडविण्यासाठी येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महात्मा फुले चौक भागात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेल्या अवस्थेत असून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घराचे दरवाजे चोवीस तास बंद ठेवावे लागत आहेत.

याबाबत स्थानिकांनी सिडको विभागीय कार्यालयात तक्रारी करूनही अद्यापही समस्या सुटत नसल्याने आता हे पाणी भरून सिडकोच्या विभागीय कार्यालयाच्या दालनातच सोडल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांमधून देण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत असून, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपा अधिकाऱ्यांनी एक दिवस फक्त आमच्या घरात येऊन थांबावे, असे आव्हानदेखील नागरिकांनी केले आहे.

"गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही हा त्रास सहन करत असून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा येथील लोकप्रतिनिधी व संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगूनदेखील अद्याप चेंबरची दुरुस्ती करण्यात आली नाही. आता तरी संबंधित महापालिकेच्या विभागाने त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करावी." - तुषार भागवत, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT