chhagn bhujbal 1.jpg e-sakal
नाशिक

यंदा सोयाबीनची १९२ किलोने हेक्टरी उत्पादनवाढ : पालकमंत्री

यंदाच्या खरिपाच्या तयारीत लॉकडाउन असला तरी शेतीकामाला अडथळे येणार नाहीत.पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विनोद बेदरकर

नाशिक : यंदाच्या खरिपाच्या तयारीत लॉकडाउन (Lockdown) असला तरी शेतीकामाला अडथळे येणार नाहीत. कृषिनिविष्ठा, खतांच्या वापरासोबत यंदा प्रत्येक गावाचा कृषी आराखडा करतानाच हेक्टरी सुमारे १९२ किलो सोयाबीन उत्पादनवाढ करण्याचा, तसेच रासायनिक खतांच्या किंमत नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय सोमवारच्या पालकमंत्री छगन भुजबळ(Guardian Minister Chhagan Bhujbal यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (Soybean production increased by 192 kg per hectare this year Says Bhujbal)

धान्य लागवडीचे नियोजन होणार

भुजबळ म्हणाले, की ६९.५५ टक्के क्षेत्रावर तृणधान्य, ५.९३ टक्के कडधान्य, लागवडीचे नियोजन आहे. प्रमुख पिकांपैकी दोन लाख ४४ हजार हेक्टरवर मका, ९५ हजार ६३३ हेक्टरवर भात लागवड होणार आहे. खरीप काळात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतपुरवठ्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. बोगस बियाण्यांतून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. पीककर्जाचा वेळेत पुरवठा व्हावा यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.

खतांच्या किमतीत वाढ

भुसे यांनी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली असून, खतांच्या किमती केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा करावा. खरिपासाठी एक लाख टन खतांची मागमी नोंदविली असून, मेपर्यंत खतासाठी अडवणूक होऊ नये म्हणून बफर स्टॉकचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी सहसंचालकांनी जिल्ह्यात कृषिनिविष्ठा काळा बाजार रोखण्यासाठी १६ भरारी पथके स्थापन झाली असून, जिल्ह्यात

रासायनिक खतांचा वापर १० टक्केच

रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत, उत्पादनाचा दर्जा आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात १० टक्के रासायनिक खत वापर कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. रायासनिक खताचा वापर कमी करतानाच, उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा सोयाबीन पिकाची हेक्टरी १९२० हून २११२ किलो हेक्टरी उत्पादन वाढविण्याचे बैठकीत सांगितले.

धान खरेदीवर लक्ष द्यावे

विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, की उत्पादन वाढत असताना त्याची खरेदी होत नसल्याची महत्त्वाची आदिवासी शेतकऱ्यांची अडचण आहे. जमीन पट्टे दिलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र अद्याप कृषी विभागाच्या नियोजनात दिसत नाही. त्या भागातील शेतकऱ्यांच्या नोंदी घेऊन त्यांच्या पिकांसाठी नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे. धान, मका खरेदीसाठी यंत्रणा राबवावी.

नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे.

-प्रत्येक गावाचा कृषी ग्राम विकास आराखडा

-महिलांसाठी शेती शाळा तसेच कार्यशाळा

-रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर

-सोयाबीनची हेक्टरी १९० किलोने उत्पादनवाढ

-शेतकरी ग्राम विचारमंचाचे होणार मार्गदर्शन

-विकेल ते पिकेल उपक्रमाला चालना देण्याचा निर्णय

-रानभाज्या महोत्सवाची जिल्हाभर व्याप्ती वाढविणे

नरेंद्र भाऊ ६२५ कोटी गेले कुठे?

बैठक कृषी आढाव्याची असली, तरी लसीकरणाचा विषय घेऊन शेतकरी कर्जापर्यंत विविध मुद्दे मांडताना आमदार नरेंद्र दराडे ऐकूनच घेत नसल्याने श्री. भुजबळ यांनी नरेंद्रभाऊ आपण संचालक असलेल्या जिल्हा बँकेला महात्मा फुले कर्जमाफी योजनेत ९५० कोटी रुपये शासनाने दिले. त्यांपैकी अवघे ३५० कोटी रुपयेच शेतकऱ्यांचा वाटले गेले, मग राहिलेले शेतकरी कर्जाचे ६२५ कोटी रुपये कुठे गेले? ते वाटता येतील ना, असा प्रश्न केला.

कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, दिलीप बोरसे, सरोज आहिरे आदींसह लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदींसह कृषी अधिकारी उपस्थित होते.

Soybean production increased by 192 kg per hectare this year Says Bhujbal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT