नाशिक : नाशिक डाक विभागाने (Postal Department) पोस्टमन व डाक सेवकांच्या माध्यमातून सर्व डाक कार्यालयातून आधारकार्डला (Adhar card) मोबाईल क्रमांक लिंक करणे, ई- मेल अद्ययावत करणे यासह पाच वर्षाखालील मुला- मुलींचे आधारकार्ड काढण्यासाठी ५ जुलैपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या सेवेचा जास्तीत- जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधिक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. (Special Expedition of Postal Department for Mobile number linking to Adhar Nashik News)
मोहिमेतून नागरिकांना घरपोच आधारला मोबाईल क्रमांक ई- मेल लिंक व अपडेट करण्याची सेवा पोस्टमनच्या व नजीकच्या डाक कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यासाठी मोठ्या हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी हे सोसायटीतील सर्व रहिवाशांसाठी एकत्रितपणे ही सेवा घेवू शकतात. याबरोबरच मोठ्या आस्थापना, कार्यालये यांच्या प्रमुखांना देखील कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे या सेवेचा लाभ घेता येईल. आधारला मोबाईल लिंक असल्याने इतर त्रयस्थ व्यक्तींकडून दुरुपयोग होऊ शकत नाही.
आधार ओटीपीद्वारे स्वतःच ऑनलाइन करून घेणे शक्य आहे. पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट काढण्यासाठी आधारला मोबाईल क्रमांक लिंक अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरणे, प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान, रिक्षा धारकांचे अनुदान व इतर योजनांसाठी आधारला मोबाईल लिंक आवश्यक आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या सर्व सदस्यांना त्यांचे यूआयएन(ईपीएफ) यापुढे आधारला लिंक असणार असल्याने आधार मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.