sakal
नाशिक

Congress News : काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्राची धुरा आमदार प्रणिती शिंदेंवर; 9 ला विभागीय आढावा

सकाळ वृत्तसेवा

Congress News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीसाठी काँग्रेसने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार पक्षाच्या सर्व कार्याध्यक्षांवर विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे.

यात प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (State Working President MLA Praniti Shinde has been assigned for North Maharashtra news)

आता येत्या ९ ऑक्टोबरला लागलीच उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक बोलाविण्यात आली आहे. आमदार शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीला सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक आणि निरीक्षकांची नियुक्त केली होती. त्यानंतर आता पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्याध्यक्षांना नवी जबाबदारी दिली आहे. याचाच भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप केले आहे.

प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्याकडे अमरावती व नागपूर विभागाची जबाबदारी दिली आहे. गत महिन्यात पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या लोकसंवाद यात्रेची उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली होती. आता आमदार शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मिळाल्यानंतर विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात जिल्हा, तसेच तालुकानिहाय आढावा घेतला जाणार आहे. आढावा बैठकीच्या दृष्टीने नाशिक शहर काँग्रेसकडून शहरात बैठका सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT