नाशिक : कोरोनामुळे पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कुलूपबंद आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देण्यात येत आहे. त्यानुसार आज (ता.२९) राज्यभर घंटानाद करण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक व त्र्यंबकेश्वरला घंटानाद होत आहे.
नाशिकमध्ये घंटनाद
१८ मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत. श्रावणही विनापूजा, दर्शनाचा गेला. आता पितरांच्या आठवणींचा भाद्रपदाचा पितृपक्ष २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. एकीकडे कोरोना महामारीचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे लोकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने उपासमारीने लोक मरण्याची वेळ आली आहे. त्याबाबत राज्य सरकार संभ्रमित असून, कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने सरकारला जागे करण्यासाठी शनिवारी (ता. २९)कपालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातच घंटानाद आंदोलन होत आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
कोरोनामुळे पाच महिन्यांपासून भाविकांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.२७) पंचवटीतील रामसेतूजवळील शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण सभेच्या कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार महाराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, ॲड राहुल ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत सुधीरदास पुजारी, कपिलधारा तीर्थाचे महंत फलहारी महाराज, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते, रामसिंग बावरी, बजरंग दलाचे विनोद थोरात, ॲड. भानुदास शोचे आदींसह धार्मिक संस्थानचे अध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?
‘दार उघड उद्धवा, दार उघड’
धार्मिक आध्यात्मिक संघटना, संस्था, प्रमुख देवस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त, विविध पंथ संप्रदायाच्या प्रमुख धर्माचार्य संत-महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. २९) सकाळी सर्व मंदिरांसमोर ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देण्यात येत आहे. सरकारने मठ-मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देणे गरजेचे आहे. परंतु ठाकरे सरकार मॉल, मांस, दारूची दुकाने सुरू करण्यात स्वारस्य दाखवित असले तरी, धार्मिक स्थळे खुली करण्याकडे कानाडोळा करत असल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन होणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.