Police deployment in the wake of tension in Nashik Shingada Lake area esakal
नाशिक

Nashik Crime: किरकोळवादातून 2 गटांकडून शिंगाडा तलाव परिसरात दगडफेक; पोलीस बंदोबस्त तैनात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : मालक आणि कामगार यांच्यातील किरकोळ वाद होऊन दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. शुक्रवार (ता.७) दुपारी शिंगाडा तलाव येथे प्रकार घडला.

परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेतील जन जखमी झाले आहे. (Stone pelting in Shingada Lake area by 2 groups due to marginalization Police deployment Nashik Crime)

शिंगाडा तलाव परिसरात कार डेकोरेटरचे मुख्य मार्केट आहे. येथील दुकानदार आणि कामगार यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता. त्यांचा आपसात समजवता झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली होती.

शुक्रवार (ता.७) यातील एका दुकानदाराने दुपारी त्याच्या दुकानासमोर वाहन पार्किंगच्या वादातून पुन्हा जुना वाद उकरून काढला. तसेच त्याने काही विशिष्ट समुदायाच्या तरुणांना बोलावून शिंगाडा तलाव येथे विशिष्ट प्रकारची घोषणाबाजी केली.

अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला. यातून दुसऱ्या समुदायाच्या तरुणांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. वाद वाढून दोघा समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. काही संधी साधूनी संधी साधत तणाव वाढविण्याचा प्रयत्न केला.

परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नुकसान होण्याच्या भीतीने सर्व व्यावसायिकांकडून त्यांच्या दुकाने बंद करण्यात आले.

पोलिसांना माहिती मिळताच शीघ्र कृती दल, मुंबई नाका पोलीस, भद्रकाली तसेच आडगाव या विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान दोन्ही गटाच्या समर्थकांकडून मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करत कारवाईची मागणी केली. दुकानदार आणि कामगारांचा किरकोळ वाद आणि वाहन पार्किंगच्या वादातून घटना घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

कुठल्याही प्रकारचा जातीय वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. काही जणांकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. दोन्ही गटातील दोषींवर कारवाई करण्यात येऊन त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे.

चौकशीत जो कोणी दोषी असल्याचे उघड होईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दगडफेकीत विनाेद थाेरात (वय. ५०, रा. तिवंधा चाैक), राहुल राऊत (वय.३०, रा. शिंगाडा तलाव), काैशल वाखारकर (वय.२८, रा. मखमलाबाद, पंचवटी) असे तिघे किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न

कामगार आणि दुकानदार यांच्यात झालेल्या किरकोळ वादास जातीय तेढ देण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आला. त्यातूनच शिंगडा तलाव परिसरात दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.

वेळीच पोलीस दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दोन समाजात तेढ निर्माण करणारे तसेच सोशल मीडियावर तेढ निर्माण केले जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही श्री.चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा रुग्णालयात तणाव

जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. यानिमित्ताने एका गटाच्या समर्थकांकडून मुंबई नाका पोलीस ठाणे येथून जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन केले. संशयीतांना त्वरित अटक करण्याची मागणी केली.

सुमारे अर्धा तास आंदोलन सुरू असल्याने याठिकाणीही तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपायुक्तसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करत कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

विविध अफवांना पेव

घडलेल्या घटनेने विविध अफवांना पेव फुटला होता. दगडफेकीत एका जणांचा मृत्यू झाला आहे. विशिष्ट समाजाच्या तरुणांनाच दुकानात कामाला ठेवावे.

तसेच जातीयवादातून दगडफेक करण्यात आली. अशा विविध भडकाऊ अफवा सोशल मीडियावर प्रसारित करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांचाही शोध पोलीस घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT