Aditya Thete esakal
नाशिक

Success Story : आदित्‍य होणार ‘NDA’ मध्ये दाखल; जिद्द, चिकाटीच्‍या जोरावर मिळविले यश!

सकाळ वृत्तसेवा

Success Story : शहरापासून नजीक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्‍या गिरणारे येथील आदित्य भाऊराव थेटे याने राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षेत यश मिळविले आहे.

तो एनडीएमध्ये दाखल होणार असून, अधिकारीपद भूषविताना देशसेवेचे स्‍वप्‍न पूर्ण करणार आहे. जिद्द, चिकाटीच्‍या जोरावर त्‍याने हे यश मिळविले आहे. (Success Story Aditya will join NDA nashik news)

गिरणारेसारख्या ग्रामीण भागातून अत्यंत कमी संसाधन उपलब्‍ध असतानादेखील त्‍याने परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर परीक्षेत यश मिळविले आहे. एनडीए'मध्ये जाण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले असल्यामुळे त्‍याने नियोजन केले होते.

कुटुंबाचे प्रोत्साहन आणि संदीप सायन्स इन्‍स्‍टिट्यूटचे संदीप घायाळ यांच्‍या मार्गदर्शनातून यश मिळवता आल्‍याची प्रतिक्रिया आदित्यने दिली. एनडीएसारख्या परीक्षेत नियोजन महत्त्वाचे आहे. परीक्षा कठीण असली तरी सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाने सर्व अडथळे दूर होतात, असा सल्‍ला त्‍याने विद्यार्थ्यांना दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर संदीप घायाळ म्‍हणाले, की आदित्य अभ्यासू विद्यार्थी असून, अकरावी, बारावी या दोन्ही वर्षी त्याने संपूर्ण अभ्यासक्रम गंभीरपणे पूर्ण केला. तो नक्‍कीच यशस्‍वी होईल, याची सुरवातीपासून आम्‍हाला खात्री होती.

शेतात काम करून अभ्यास

आदित्‍यचे वडील भाऊराव थेटे अल्पभूधारक शेतकरी असून संपूर्ण कुटुंबाचे शेती हे एकमात्र उत्पन्नाचे साधन आहे. आदित्यदेखील बारावी आणि एनडीए परीक्षांचा अभ्यास सांभाळून वडिलांना शेतीकामात मदत करायचा.

तो केटीएचएम महाविद्यालयाचा विद्यार्थी असून यंदाच्या बारावीच्या परीक्षेत त्याने नव्वद टक्‍के गुण मिळवत महाविद्यालयातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्‍यापाठोपाठ त्‍याने एनडीए परीक्षेत यश मिळविताना दुहेरी यश संपादन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीला झालाय असाध्य आजार; मुलाने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

SCROLL FOR NEXT