Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Sudhakar Badgujar Fraud Case: ‘लाचलुचपत’कडून पुराव्यांवर भर! अपहार प्रकरणी लवकरच बडगुजर यांची चौकशी

महापालिकेतील विविध कामांचे ठेके घेताना पदाचा दुरुपयोग केल्याने अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणात ‘लाचलुचपत’ पुरावे गोळा करण्यात गुंतलेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत डान्सपार्टीचा व्हिडिओप्रकरणी गोत्यात आलेले शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही चौकशीचा ससेमिरा सुरू होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील विविध कामांचे ठेके घेताना पदाचा दुरुपयोग केल्याने अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणात ‘लाचलुचपत’ पुरावे गोळा करण्यात गुंतलेले आहेत. (Sudhakar Badgujar Fraud Case Emphasis on Evidence from ACB Investigation of Badgujar soon in embezzlement case Nashik Crime)

गेल्या १७ तारखेला सरकारवाडा पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

२०१६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रार अर्जांची ‘लाचलुचपत’च्या पथकाने खुली चौकशी करून तपासीअंती गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना ‘लाचलुचपत’च्या पथकाने बडगुजर यांना चौकशीसाठी बोलाविले असता, त्यांनी यासंदर्भात काही महत्त्वाची कागदपत्रे माहितीच्या अधिकारान्वये मागविली आहेत.

त्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतीची मागणी केली होती. त्यानुसार, त्यांना मुदत दिली असली तरी त्यापूर्वीही बडगुजर यांना बोलाविल जाण्याची शक्यता आहे.

त्यासाठी तपासी पथकाकडून अपहाराशी संबंधित कागदपत्रांचे पुरावे गोळा करून त्यांचा अभ्यास केला जात आहे.

याच पुराव्यांच्या आधारे बडगुजर यांना तपासी पथकाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बडगुजर यांना लवकरच ‘लाचलुचपत’च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावे लागण्याची शक्यता आहे.

असे आहे प्रकरण

सुधाकर बडगुजर यांची ‘बडगुजर ॲण्ड कंपनी’ आहे. त्यांनी या कंपनीतून २००६ मध्ये निवृत्त होत २००७ पासून ते महापालिकेत नगरसेवक आहेत.

नगरसेवक असताना बडगुजर यांनी पदाचा दुरुपयोग करीत कंपनीला विविध कामांचे ठेके दिले आणि त्या माध्यमातून स्वत:चा आर्थिक लाभ घेतला.

यातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. याबाबत तत्कालिन मनपा आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT