Sheep left to graze on the onion crop.
Sheep left to graze on the onion crop. esakal
नाशिक

Summer Onion Crop : उन्हाळी कांदा पिकात सोडल्या मेंढ्या

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : मुंजवाड (ता.बागलाण)येथील शेतकरी (Farmer) संजय ढाबळे यांनी करपा रोग व बदलत्या हवामानाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या चार एकर

उन्हाळी कांदा पीक क्षेत्रात मेंढ्या चारून रोटर फिरविले. (summer onion crop were fed by sheep rotor because of Karpa disease changing weather conditions nashik news)

श्री. ढाबळे यांनी त्यांच्या मुंजवाड शिवारातील गट नंबर ६६४ मधील चार एकर क्षेत्रात पाच वर्षांपूर्वी आरक्ता डाळिंब पिकाची लागवड केली होती. दोन तीन वर्षे चांगले उत्पादन मिळाले. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून अतिवृष्टी तसेच मर व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने चार एकर क्षेत्रावरील पूर्ण डाळिंब पीक सहा महिन्यांपूर्वी काढून टाकले.

त्यानंतर चार एकर क्षेत्रावर दीड महिन्यांपूर्वी ठिबक सिंचन संच बसवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा लागवड केली. महागडे खते, बियाणे वापरून चार एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली. पिकावर दोन वेळेस तणनाशक फवारणीही केली. मात्र लागवडी नंतर २५/३० दिवसातच लागवड क्षेत्रावर करपा व मररोगाचा प्रादुर्भाव वाढला.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

महागडी औषधे फवारणी करूनही करपा व मर आटोक्यात आला नाही, त्यामुळे संजय ढाबळे यांनी करपा रोगाने वाया गेलेल्या चार एकर क्षेत्रात वर मेंढ्या चारून कांदा पीक नेस्तनाबूत केले. त्यानंतर रोटरने पुन्हा मशागत केली. कांदा पिकावर केलेला दोन लाखांपेक्षा जास्त खर्च वाया गेला आहे.

शासनाने पीक पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केली तर पीक कर्ज परतफेड, मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च, निसर्गाचा लहरीपणा व खते, बी बियाणांच्या चढ्या भावामुळे शेती व्यवसाय परवडत नसल्याचे श्री. ढाबले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT