Suspect remanded in custody for 3 days in case of murder of witch woman nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : मांत्रिक महिलेच्या खून प्रकरणी संशयिताला 3 दिवस कोठडी

प्रतीक जोशी

Nashik Crime News : शिंदे येथील मांत्रिक महिलेचा खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला शनिवारी (ता. ८) न्यायालयात उभे केले असता, तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शिंदे येथील शिवरत्न चौकात मांत्रिक महिला जनाबाई बर्डे हिचा शुक्रवारी (ता. ७) निकेश दादाजी पवार या भक्ताने चाकूने वार करून तिचा खून केला होता. (Suspect remanded in custody for 3 days in case of murder of witch woman nashik crime news)

या घटनेनंतर काही वेळातच नाशिक रोड पोलिसांनी संशयिताला चाकूसह अटक केली. दरम्यान, सदर घटना समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, निरीक्षक पवन चौधरी, सहाय्यक निरीक्षक शेळके हे तातडीने दाखल झाले व संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली.

ज्या महिलेचा खून करण्यात आला, ती महिला जनाबाई बर्डे ही मांत्रिक होती. तिच्याकडे अनेक भक्त येत असतं. त्यापैकीच निकेश पवार (रा. जेल रोड) हा सुद्धा आपल्या अडीअडचणी घेऊन जात असे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु काही गुण न आल्याने वैतागलेल्या निकेश पवार यांनी या महिलेच्या गळ्यावर चाकूचे वार करून तिचा खून केला.

दरम्यान, निकेश पवार याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे जाबजबाब घेतले. तसेच याप्रकरणी रंजना अरुण माळी यांनी नाशिक रोड पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित पवार यास न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक पवन चौधरी हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT