murder case esakal
नाशिक

Nashik Crime News : विम्याची रक्कम हडपणाऱ्या संशयितांनी फिरस्त्याचा केला खून

नरेश हाळणोर

नाशिक : चार कोटीचा विमा हडप करण्यासाठी संशयितांनी कटात सामील विमाधारकाचाच खून केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल आहे. याच संशयितांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये गंगाघाटावरील एका फिरस्त्याला रात्रभर दारू पाजून म्हसरुळ-आडगाव शिवारात नेले आणि त्याच्यावरून कार चालवून त्याची हत्त्या केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल असून, दरम्यान या टोळीने विम्याच्या रकमा हडपण्यासाठी आणखीही काही गंभीर कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही. (Suspects who grabbed insurance money killed policy holder Nashik Crime News)

संशयित आरोपी मंगेश बाबुराव सावकार (३० रा. बुध्दविहार समोर, सम्राट नगर, दिंडोरी रोड), रजनी कृष्णदत्त उके (३९ रा. गणेश रो हाऊस न. २ मेरी रासबिहारी लिंकरोड, श्रीरामनगर, पंचवटी), दीपक अशोक भारुडकर (३१ रा. नंदिनी नगर), प्रणव राजेंद्र साळवी (२२ रा. उत्कर्ष अपार्टमेंट बुधवार पेठ, भद्रकाली), योगेश साळवी, मयत अशोक सुरेश भालेराव (४६ रा. देवळाली कॅम्प) अशी संशयितांची नावे आहेत.

म्हसरुळ पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार, संशयितांनी गंगाघाटावरील एका गुजराथी फिरस्त्याला हेरले होते. त्याच्याशी ओळख परिचर करून त्यास गेल्या २६ जानेवारी २०२१ रोजी रात्री अकरा वाजेपासून पहाटे चारवाजेपर्यंत या अज्ञात गुजराथी इसमाला दारू पाजली.

त्यानंतर त्याला लाल रंगाच्या स्कार्पिओ गाडीत टाकून पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास आडगांव-म्हसरूळ लिंक रोडवरील जगन्नाथ लॉन्सच्या पुढील हॉटेल रोहिणी गार्डनजवळ गाडीतून रस्त्यावर टाकले आणि त्याच्या अंगावर गाडी चालवून त्याची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खून, अपहरण, कट रचणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

अन्‌ कट फसला

संशयितांना मयत अशोक भालेराव याच्या नावावरील ४ कोटींच्या विम्याची रक्कम हडप करायची होती. त्यासाठी ते त्याच्याच शारीरिक बांध्याचा इसम शोधून त्याचा अपघाती मृत्यु घडवून ती रक्कम हडप करण्याचा कट होता. त्यासाठीच त्यांनी गंगाघाटावरील अज्ञात गुजराथी फिऱस्त्याला हेरले आणि कटानुसार त्याची अपघाती हत्त्या घडवून आणली. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील किचकट कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांनी रचलेला कट फसला.

शेवटी सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी विमाधारक भालेराव याचाच काटा काढला आणि इंदिरानगर जॉंगीग ट्रॅकजवळ त्यच्यावरही वाहन चालवून हत्या केली आणि अपघाताचा बनाव रचला. त्यानंतर त्यांनी ४ कोटींची रक्कम हडप केली. मात्र कटातील सामील असलेल्या एकाला कमी रक्कम मिळाल्याने या कटाचे बिंग फुटले आणि गेल्या १३ डिसेंबर रोजी मुंबई नाका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT