SYSTEM
नाशिक

ताडपत्रीचे दर कडाडले; शेतकरी वर्ग वळला बॅनर खरेदीकडे

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शेती आणि घराची डागडुजीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

साकोरा (जि. नाशिक) : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शेती आणि घराची डागडुजीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ताडपत्री खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांनी साठवलेले अन्नधान्य सुरक्षित राहण्यासाठी या ताडपत्रीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बाजारात ताडपत्रीच्या किमती २० ते ३० रुपये प्रतिकिलोने वाढलेला आहे. शेतकरी ताडपत्रीचे भाव वाढल्याने तात्पुरती सोय म्हणून बॅनर खरेदी करीत आहे.

पावसाळा सुरू झाला की शेतकरी साठवलेले अन्नधान्य पावसात भिजू नये, यासाठी प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचा वापर करतो. जनावरांचा गोठादेखील या ताडपत्रीच्या मदतीने झाकला जातो. सर्वसामान्य नागरिकदेखील या ताडपत्रीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पावसाच्या पाण्याने घराला गळती लागलेली असेल तर या ताडपत्रीचा वापर घराच्या पत्र्यांवर टाकण्यासाठी केला जातो. यामुळे पावसाळा सुरू होताच ताडपत्री व बॅनरला मोठी मागणी असते. नांदगावच्या बाजारात ताडपत्रीचे किलोमागे २०-३० रुपयांनी दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. पावसाला प्रत्यक्ष सुरूवात झाली की ताडपत्रीचे आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.

''देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या किमतीवर झालेला आहे. अशा महागाईची झळ ताडपत्री खरेदीदारांना बसलेली आहे, असे दिसते.'' - ज्ञानेश्‍वर सुरसे, स्थानिक शेतकरी

''बाजारात मागणी वाढल्यास भाव वाढेल. मागीलवर्षी लॉकडाऊनमुळे बाजारातील ताडपत्री विक्री झाली नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी गेल्यावर्षीची ताडपत्री यावर्षी विक्रीला काढली आहे. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर ताडपत्रीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते.'' - शेख, ताडपत्री विक्रेता, नांदगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Nashik Cctv Network : सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर; पण नाशिकचा 'तिसरा डोळा' बंदच! १० वर्षांनंतरही सीसीटीव्हीचे जाळे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार; मुख्य आरोपीवर सात गुन्ह्यांची नोंद

Mumbai News: रिक्षाचालकांची दादागिरी! नियमापेक्षा जादा भाडे आकारतात; प्रवाशांच्या खिशाला कात्री 

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT