vijay dhumal.jpg 
नाशिक

क्रूर नियती! दीड महिन्यापूर्वीच झाला होता विजयचा विवाह...अचानक कुटुंबीयांवर दु:खाचे सावट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / म्हसरूळ : रात्री दुकान बंद करून दोघे भाऊ ॲक्टिव्हा वरून घराकडे जात असताना तारवालानगरकडून अमृतधामकडे भरधाव जाणाऱ्या पिक-अपने जबर धडक दिली, त्यात दोघे गाडीवरून खाली पडले. आणि त्यात असे काही घडले की कुटुंबीयांवर दु:खाचे सावट पसरले.

अजय धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुमाळ बंधूंनी काही दिवसांपूर्वी आडगाव शिवारात खाद्यपदार्थ हातगाडी सुरू केली होती. शनिवारी (ता. ११) रात्री दुकान बंद करून दोघे ॲक्टिव्हा (एमएच १५, ईझेड ९५२७)वरून अमृतधाम-तारवालानगर लिंक रोडने घराकडे जात असताना तारवालानगरकडून अमृतधामकडे भरधाव जाणाऱ्या पिक-अप (एमएच १५, एफव्ही १८१८)ने भास्कर प्लॅनेट इमारतीसमोर जबर धडक दिली, त्यात दोघे गाडीवरून खाली पडले. त्यात विजयच्या डोक्याला, हातापायाला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाल, तर संजय जखमी आहे. अपघातानंतर पिक-अप घटनास्थळापासून १०० फुटांवर झाडाझुडपांत अडकली. त्यानंतर चालक गाडी सोडून पळून गेला. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने पोलिस वाहनातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृत विजय धुमाळ यांचा दीड महिन्यापूर्वी विवाह झाला होता.

कुटुंबियांवर शोककळा

अपघातात ठार झालेले मृत विजय शंकर धुमाळ (वय २९) जुना गंगापूर नाका परिसरात राहतात. जखमी झालेला त्यांचा लहान भाऊ संजय शंकर धुमाळ यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या ॲक्टिव्हाला अमृतधाम-तारवाला लिंक रोडवर समोरून येणाऱ्या भरधाव पिक-अपने धडक दिल्याने दोघा सख्ख्या भावांपैकी विजय शंकर धुमाळ जागीच ठार झाले, तर दुसरा भाऊ जखमी झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'५५५ बीडी'च्या मालकाची मुलानेच केली हत्या, गोळी झाडून घेत स्वत:लाही संपवलं; काय घडलं?

Bengaluru Doctor Case : मी तुझ्यासाठी तिला मारलं, पत्नीच्या हत्येनंतर लग्नाचे प्रस्ताव नाकारलेल्या महिलांना केले मेसेज

Latest Marathi News Live Update : करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरजू टेकसोलच्या मालमत्तेवर कारवाई

Dry Eye Risk in Youth: डिजिटल युगात डोळ्यांवर येणाऱ्या ताणामुळे तरुणाईंला 'Dry Eye'चा धोका! शरीरात हे बदल दिसताच करा पुढील उपाय

Zubair Hungregkar Case: जुबेर हंगरेगकरचे ‘अल कायदा’शी संबंध प्रकरण! ‘वाहदते मुस्लिम ए हिंद’च्या पदाधिकाऱ्यास एटीएसची नोटीस, चौकशी होणार..

SCROLL FOR NEXT