ZP school esakal
नाशिक

Nashik ZP School: दिंडोरी तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर; एक तास आधीच शाळेतून शिक्षक गायब

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी अटोकाट प्रयत्न केले जातात. शासन स्तरावरुन विशेषत: पेसा अंतर्गत गावांमध्ये शिक्षकांचा तुटवडा होवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाते.

मात्र, ठेपणपाडा (ता. दिंडोरी) येथील शाळा सुटीच्या एक तास आधी विद्यार्थ्यांना सोडून शिक्षक व मुख्याध्यापक गायब झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.(teacher disappeared from school one hour ago nashik news)

ठेपणपाडा येथे द्विशिक्षिकी शाळा आहे. ३६ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचनंतर विद्यार्थी पालकांच्या स्वाधीन होईपर्यंत शिक्षकांना शाळेत उपस्थित असणे बंधनकारक आहे. असे असताना चारलाच विद्यार्थ्यांना शाळेतून सुटी देत शिक्षकाने शाळेतून पलायन केले.

ही नक्कीच खंबीर बाब असल्याने एक तास आधी शाळा का सोडण्यात आली, याबाबत नोटिशीच्या माध्यमातून वरिष्ठांनी लेखी खुलासा मागविला आहे. याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, प्रशासकीय कामासाठी केंद्र शाळेवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

''ठेपणपाडा शाळेवर दोन शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याची माहिती मिळते. त्याची अनुपस्थिती कायदेशीर होती का, याची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर प्रशासकीय कामकाज असले, तरी एकच शिक्षक उपस्थितीत असताना, शाळा सोडून येण्याची परवानगी आम्ही दिलेली नव्हती. याबाबत त्यांना नोटीस दिली असून, त्यांच्या खुलाशावरून आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.'' -कैलास पगार, विस्ताराधिकारी, शिक्षण विभाग, दिंडोरी

''निगडोळ केंद्रप्रमुखांनी राजीनामा दिल्याने मी निगडोळ केंद्र शाळेचा मुख्याध्यापक असून, माझ्याकडे प्रशासकीय कागदपत्रे देण्यासाठी केंद्रातील शिक्षकांनी शुक्रवारी उपस्थिती लावली होती. ठेपणपाड्याचे मुख्याध्यापक शाळेवर आले होते. त्यावेळेस मी पालक भेटीसाठी बाहेर गेल्याने माझी भेट झाली नाही. मात्र, फाईलमध्ये त्यांचे कागदपत्र जमा असल्याचे कळते.''-राजेंद्र उगले, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, निगडोळ

''आमच्या केंद्राच्या व्हॅटसअ‍ॅप ग्रुपवर विस्तार अधिकाऱ्यांची मेसेज आला होता. त्यात सप्टेंबर अखेरपर्यंतची वर्ग वाटणी तक्ता तत्काळ मागविला होता. विस्तार अधिकाऱ्यांचा मोबाईलवरील संदेश बघून मी दुपारी सव्वाचारला शाळेला सुट्टी देऊन केंद्र शाळेवर प्रशासकीय कागदपत्र देण्यासाठी गेलो होतो.'' -जाधव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, ठेपणपाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT