Teachers Recruitment esakal
नाशिक

Teacher Recruitment : टेटच्या निकालामुळे लक्ष पवित्र पोर्टलकडे; 'या' तारखेपूर्वी पदे भरली जाणार

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांमध्ये सद्य:स्थितीत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सुमारे ३२ हजार शिक्षक कमी आहेत.

माध्यमिक शाळांमध्येही २९ हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुमारे ३० हजार पदांची भरती (Teacher Recruitment) शालेय शिक्षण विभागाकडून केली जाणार आहे. (teacher recruitment About 30 thousand posts are going to be recruited by school education department nashik news)

आता ‘टेट’चा निकाल जाहीर झाल्याने भरती प्रक्रियेला वेग आला आहे. १२ जूनपूर्वी पदे भरली जाणार असून ८० टक्के पदे भरली जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. याबरोबरच पवित्र प्रणालीचे काम एनआयसी पुणेकडून काढून मे. तलिस्मा कॉर्पोरशन प्रा. लि. बेंगळुरु या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. उमेदवारांचे लक्ष आता पवित्र पोर्टलकडे लागले आहे.

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी ‘टेट’उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीनेच त्याठिकाणी संबंधित उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती होणार आहे. खासगी अनुदानित संस्थांना मात्र दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्यांच्या संस्थेतील रिक्तपदासाठी एका जागेसाठी एक की दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे, याचा निर्णय संबंधित संस्थेनेच घ्यायचा आहे. पण, त्या पदभरतीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. भरतीपूर्व राज्यभरातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात त्यांना सूचना दिल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

तीन महिन्याने पुन्हा संधी

सरकारने १० नोव्हेंबर २०२२ रोजी एक आदेश काढला आहे.त्यानुसार शासकीय पदांची भरती करताना काही कारणास्तव एखाद्या विभागाला पहिल्या टप्प्यात पदभरतीस अडचणी आल्या,तर त्यांना तीन महिन्यांनी पुन्हा पदभरतीची जाहिरात काढून भरती करता येणार आहे.त्यासाठी बिंदुनामावली अद्ययावत असणे बंधनकारक आहे.

मागासवर्गीय कक्षाकडून त्याची पडताळणी करावी लागणार आहे.तर शिक्षक भरती ही २०२२-२३च्या आधार बेस्‌ड संचमान्यतेवर होणार आहे.दरम्यान,जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे १५ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील १५ हजार पदांची भरती होईल.

आता ‘टेट’ बंधनकारकच

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांच्या ‘टेट’चा निकाल २४ मार्चला जाहीर केला. त्यात जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांना दोनशेपैकी १००पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्या उमेदवारांना आता त्यांचे प्रोफाइल तयार करावे लागणार आहे.

दरम्यान,पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक म्हणून अर्ज करणारा उमेदवार ‘टीईटी’उत्तीर्ण झालेला असावा.तर कोणत्याही शाळांवर शिक्षक होणारा उमेदवार ‘टेट’ उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

तो अधिकार मात्र संस्थांना

शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे.

दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT