Gorakh Sanap, student and teacher of Vainteya Primary Vidyamandir Niphad School, enjoying the 'Bhel' poem in real action. 
नाशिक

Nashik News : चिमुकले बनले 'मास्टर शेफ'; कृतीयुक्त शिक्षणातून अनुभवली 'भेळ' कवितेची गोडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कविता शिकवताना फक्त पाठ करून न घेता प्रत्यक्ष कवितेचा अनुभव दिला तर तो विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहतो.

वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड येथील शिक्षक गोरख सानप यांनी पाठ्यपुस्तकात आलेली भेळ कविता प्रत्यक्ष कृतीतून सादर करून विद्यार्थ्यांना कवितेची गोडी लावली. (teacher teaches student poem bhel by making bhel nashik news)

ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीला अधिक महत्त्व दिले जाते. नवीन अभ्यासक्रमात देखील विद्यार्थ्यांच्या कृतीला चालना पूरक उपक्रम देण्यात आले आहेत. मास्टर शेफची टोपी घालून भेळ कवितेतील विविध कृती विद्यार्थ्यांनी स्वतः करून चटकदार भेळ तयार केली.भेळ सोबतच शेव पुरी, भेळ पुरी, पाणी पुरी, ओली भेळ, सुकी भेळ, प्रत्यक्ष करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

विद्यार्थ्यांनी गट करून चुरमुरे, शेव, पापडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लिंबू, चिंच, मीठ, काकडी, मिरची असे भेळ साठी लागणारे सर्व साहित्य जमा केले. मुलींनी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापली. मुलांनी शेव, पापडी, चुरमुरे एकत्र केले. शिक्षकांच्या मदतीने मजेदार भेळ तयार झाली. कविता म्हणत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भेळेची चव चाखली. यानिमित्ताने स्व-निर्मित भेळीचा आनंद लुटत घरकामात आई- वडिलांना मदत करण्याचे धडे नकळत विद्यार्थ्यांना मिळाले.

या उपक्रमाचे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष वि.दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त ॲड. ल.जि. उगावकर, राजेंद्र राठी, किरण कापसे, राजेश सोनी, ॲड. दिलीप वाघावकर, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, विश्वास कराड, नरेंद्र नांदे, निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एल. के भरसट, विस्ताराधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख नीलेश शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे व पालकांनी कौतुक केले.

"विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून कवितेची गोडी लावून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देवून बालवयातच आई- वडिलांना घरकामात मदत करण्याची वृत्ती निर्माण करून आदर्श नागरिक घडविणारा हा स्तुत्य उपक्रम आहे." -वि. दा. व्यवहारे, कार्यकारी अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT