Malegaon: Ujwala and Anil Bachhao in Soygaon area while planting a bela sapling near their house
Malegaon: Ujwala and Anil Bachhao in Soygaon area while planting a bela sapling near their house esakal
नाशिक

Malegaon News : शिवमहापुराण कथेमुळे आठवडेभरात 10 हजारावर बेलाच्या रोपांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : पुण्य श्री शिव महापुराण कथेमुळे मालेगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिव मंदिरांमध्ये रोज गर्दी होत आहे. पंडीत प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेल्या उपदेशानुसार मालेगावकरांसह भविकांकडून श्री महादेवाला बेलपत्र व जलाभिषेक केला जात आहे.

बेल, शमी व आवळा या वृक्षांची मागणी वाढली आहे. येथील विविध नर्सरींमध्ये आठवड्यात दोन हजारावर बेलाच्या रोपांची विक्री झाली. जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात बेल, शमी व आवळा रोपांची लागवड वाढली आहे.

घराघरांत अंगणात बेल व शमीच्या वृक्षांचे रोपण केले जात आहे. आज नववर्षाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. पंडीत प्रदीप मिश्रा यांनी कथेतून बेलपत्र, शमीपत्र व आवळ्याच्या वृक्षाचे महत्त्व विशद केले. (Ten Thousand Bela plant sold in a week due to Shiv Mahapuran story Nashik News)

त्यांनी केलेल्या उपदेशाची हजारो शिवभक्त अंमलबजावणी करीत आहेत. शहरासह ग्रामीण भागात देखील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. जलाभिषेक बरोबरच बेलपत्र अर्पण केले जात आहे. एरवी श्रावण महिना वगळता बेलाला फारशी मागणी नसते. सध्या शिव मंदिराजवळ बेलपत्राची विक्री होत आहे.

ग्रामीण भागात शेतमळे व इतर भागातून बेलपत्र आणले जात आहे. नागरिक बेल, शमी व आवळ्याच्या रोपांची लागवड करीत आहेत.


पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या उपदेशानुसार महादेवाच्या पिंडीवर एक तांब्याभर पाण्याचा जलाभिषेक करून बेलपत्र व शमीपत्र रोज अर्पण करावे. तसेच आवळ्याच्या झाडाखाली गायीच्या तुपाचा दिवा लावावा. पशुपतीनाथाचे व्रत करावे. शिव महापुराण कथा सुरु झाल्यापासून मालेगावसह खान्देशमधील विविध नर्सरींमध्ये बेल, शमी व आवळ्याच्या रोपांची विक्री वाढली आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

दोन हजारावर पोचली विक्री
मालेगाव येथे सहा नर्सरी आहेत. एरवी सर्व मिळून महिन्याकाठी सुमारे दीडशे ते दोनशे बेलाचे रोप विक्री व्हायचे. शिवमहापुराण कथेमुळे आठवड्यातच दोन हजाराच्या आसपास रोपांची विक्री झाली. बेलाचे सहा इंची रोप ३० रुपयाला तर १२ इंची रोप ५० रुपयाला मिळत आहे. ६ फुटाच्या रोपाची किंमत ३०० रुपये आहे. शमीचे १२ इंची रोप पुर्वी ७० रुपयाला मिळत होते. मागणी वाढल्याने ते आता शंभर रुपयाला मिळत आहे. आवळा ६ इंची ३० रुपयाला तर १२ इंची ५० रुपयाला विकले जात आहे.

पुणे व नाशिक येथून रोपे नर्सरीजला उपलब्ध होतात. काही नर्सरी चालक राजमंड्री (आंध्रप्रदेश) येथून रोपे मागवित आहेत. नाशिक शहरात ३० पेक्षा अधिक तर संपूर्ण जिल्ह्यात ७० ते ७५ नर्सरी आहेत. उत्तर महाराष्ट्रातून आठवडाभरात दहा हजारावर बेल, शमी व आवळ्याची रोपे विकले गेल्याचा अंदाज आहे. भविष्यातही ही मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.

"शिवमहापुराण कथा सुरु झाल्यापासून आमच्या नर्सरी मधून बेल, शमी व आवळा रोपाची विक्री वाढली आहे. एरवी महिन्याला ५० रोपे विकली जायची. गेल्या आठ ते दहा दिवसात अडीचशे ते तीनशे रोपे विकली गेली. बारा इंची रोपांना सर्वाधिक मागणी आहे. सध्या पुणे येथून रोपे मागवित आहे. दिवसेंदिवस रोपांना मागणी वाढत आहे."
- पोपट पवार, संचालक, धनदाई नर्सरी, दाभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT