येवला : गहू, हरबऱ्यांसह कांद्याचे क्षेत्र वाढणार!  sakal
नाशिक

येवला : गहू, हरबऱ्यांसह कांद्याचे क्षेत्र वाढणार!

जिल्ह्यात यंदा मुबलक पाण्यामुळे रब्बीचे १ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र, पेरणीला वेग

संतोष विंचू

येवला : परतीच्या पावसाने खरिपाचे लाखो कोट्यवधीचे नुकसान झाल्याने हिरमुसलेल्या शेतकऱ्याला आता रब्बीकडून आशा आहे. नुकसान करणाऱ्या पावसाने रब्बीची पायाभरणी केल्याने यावर्षी मुबलक पाणी असल्यामुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. हरभऱ्यासह कांदा व मक्‍याच्या क्षेत्रात देखील यंदा वाढ होण्याची स्थिती आहे. काही तालुके बागायतदार तर काही दुष्काळी अशी रचना असलेला जिल्हा मुळात खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो. दीड हजाराहून अधिक गावे खरिपाची आहेत.

जोरदार पाऊस होऊन नदी, नाले, विहिरी तुडुंब झाल्या. अवर्षणप्रवण भागातही काही प्रमाणात रब्बीची पिके निघतात. यावर्षी सुरुवातीला पावसाने दगाबाजी केली असली तरी सरतेशेवटी धोधो पाऊस पडल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहिले. विहिरीदेखील ओव्हरफ्लो होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. खरिपात शेतकऱ्यांना बंपर उत्पादन येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सप्टेंबर-ऑक्टोबरच्या अखेरीस अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यातून खरिपाच्या पिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

यंदा कांद्याकडे ओढा जास्त

यातून सावरत शेतकरी आता रब्बीच्या पेरणीकडे वळाला आहे. मालेगाव, येवला, नांदगाव, चांदवड या दुष्काळी भागात लवकर पाणी संपते, त्यामुळे शेतकऱ्यांनी आगाऊ पेरण्याना प्राधान्य दिले आहे. अनेक भागात गव्हाची पेरणी देखील उरकली आहेत. याशिवाय चांगले भाव मिळत असल्याने कांद्याकडे देखील या वर्षी शेतकऱ्यांचा अधिक ओढा आहे. पुरेशे पाणी असल्याने गहू व हरभऱ्याचे क्षेत्र नेहमीप्रमाणे वाढते राहील याशिवाय मका, ज्वारी, उसाच्या क्षेत्रातही वाढ होताना दिसू शकेल. मालेगाव, देवळा, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड या भागांमध्ये गव्हासह हरभऱ्याचे क्षेत्र अधिक असते. मालेगाव, बागलाण, नांदगाव, इगतपुरी, नाशिक, सिन्नर, येवला, निफाड तालुक्यात मागील दोन वर्षापासून रब्बीच्या मकासाठी अधिक क्षेत्र गुंतवले जात आहे. त्यामुळे बदलता रब्बीचा पीक पॅटर्न जिल्ह्यात यंदाही पाहायला मिळू शकेल.

अवर्षणप्रवण भागात पेरणीने वेग घेतला असला तरी कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून कळवण, देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, येवला हे तालुके पेरणीत आघाडीवर दिसत आहेत. येथे २ ते १० टक्क्यांपर्यत पेरणी झाली आहे. पुढे जाणवणारी पाणीटंचाई व सध्या असलेल्या रोपांच्या टंचाईमुळे बहुतांशी शेतकरी कांदा लागवडीकडे वळाल्याचीही स्थिती आहे.

मागील वर्षी १११ टक्के पेरणी

मागील वर्षीही जोरदार पाऊस असल्याने मालेगाव, बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला आदी तालुक्यात सव्वाशे टक्क्यावर पेरण्या झाल्या होत्या. यावर्षीही पाण्याची स्थिती चांगली असल्याने पेरणीचे क्षेत्र वाढू शकते. पेरणीचा जुगार शेतकऱ्यांना खेळावा लागतो.

तालुकानिहाय अशी होते पेरणी (हेक्टरमध्ये)

तालुका - सर्वसाधारण क्षेत्र – २०२० ची पेरणी

मालेगाव - ८०७०- १३८६१, सटाणा - ११७२५ - १३०८१, कळवण - ७९९३ - ८३८९ , देवळा - २४१३ - २१५५, नांदगाव - ५१४३ - ९३०४, सुरगाणा - २८०३ - २४८७, नाशिक - ३६८० - ३११५ , त्रंबक- २०९७ - १३०१, दिंडोरी- १०८८६ - ११०९८, इगतपुरी - ३१६९ - २२६५, पेठ - १७०५ - १९९०, निफाड - १७८९१ - १५४५७, सिन्नर - १७१०९ - २१२२९, येवला - १०९६८ - १३८८९, चांदवड - ७१२० - ५९५३, एकूण - ११२७८९ - १२५५७७

पिकनिहाय पेरणी क्षेत्र (हे.)

पिके- सरासरी क्षेत्र - झालेली पेरणी

  • ज्वारी - 6322- 65

  • गहू - 62425 - 1642

  • मका - 4077 - 81

  • हरबरा - 38197 - 1128

  • सूर्यफूल - 18 - 0

  • एकूण पेरणी क्षेत्र - 112779 - 2946

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT