Indian Railways  esakal
नाशिक

Nashik News : इगतपुरी- भुसावळदरम्यान तिसरी रेल्वेलाइन; नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद

भुसावळ विभागासाठी सुमारे 1500 कोटी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक- मनमाड : केंद्रीय अर्थसंकल्पात भुसावळ रेल्वे विभागासाठी सुमारे १,५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यात इगतपुरी ते भुसावळदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणासह देवळालीच्या रेल्वेगेट आणि मनमाड- जळगाव अतिरिक्त रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे.

देवळाली गेट क्रमांक ९० येथे उड्डाणपुलासाठीही ६.६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी दिली. (Third railway line between Igatpuri Bhusawal Provision for survey of new railway line Nashik News)

अंदाजपत्रकात भुसावळ विभागातील मुंबईकडे, नागपूर, खंडव्याकडे जाणाऱ्या मार्गावर तिसरा, चौथा रेल्वे मार्ग तयार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी काही मार्गावर सर्वेक्षण करावे लागणार आहे. विभागात नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी आठ कोटी १७ लाखांची तरतूद आहे.

दरम्यान, खानदेशासाठी वरदान ठरणाऱ्या अन् बहुप्रतिक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी अवघ्या दोन कोटींची तरतूद करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे याच मार्गावरील धुळे-नरडाणा मार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ही समाधानाची बाब आहे.

भुसावळ विभागातील नवीन सात रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात, इगतपुरी-भुसावळ नवीन तिसरी लाइन ३०८ कि.मी (१५ लाख), भुसावळ-खंडवा नवीन तिसरी/ चौथी लाइन १२३ कि.मी.

(१५ लाख), औरंगाबाद- भुसावळ नवीन लाइन १६० कि.मी. (१५ लाख), औरंगाबाद- बुलढाणा- खामगाव नवीन लाइन १७० कि.मी. (२५ लाख), भुसावळ-बडनेरा- वर्धा नवीन चौथी लाइन ३१३ कि.मी.- (५.२६ कोटी), भुसावळ- खंडवा नवीन तिसरी/ चौथा मार्ग (एक कोटी) आणि मनमाड- जळगाव नवीन चौथी लाइन अंतिम स्थळ निश्चिती सर्व्हे- (एक कोटी).

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

बांधकामासाठी ५२३ कोटी

भुसावळ विभागात सुरू असलेल्या सहा कामांसाठी ५२३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात इंदूर- मनमाड- ३६८ कि.मी. (दोन कोटी), धुळे-नरडाणा- ५० कि.मी. (१०० कोटी), पाचोरा- जामनेर- मलकापूर- ८४ कि.मी. (५०.२० कोटी), भुसावळ- जळगाव तिसरी लाइन- (एक कोटी), मनमाड-जळगाव तिसरी लाइन- १६० कि.मी. (३५० कोटी), जळगाव- भुसावळ चौथी लाइन- २५ कि.मी.- (२० कोटी).

दुहेरी मार्गासाठी ४२७ कोटी

दुहेरी मार्गापैकी मनमाड-जळगाव तिसरी लाइन- १६० कि.मी.(३५० कोटी), तर जळगाव- भुसावळ चौथी लाइन- (२० कोटी) याप्रमाणे ३७० कोटींची तरतूद आहे. विद्यमान रेल्वेस्थानकातील यार्ड रिमॉडेलिंगची कामे-१५.२५ कोटी, नवीन रस्ता ओव्हर ब्रिज उड्डाणपूल/पुलाखालचा रस्त्यासाठी ४३.६३ कोटींची तरतूद आहे.

उड्डाणपूल आणि रेल्वेगेट होणार

भुसावळ विभागात जळगाव- गेट क्र. १४७ उड्डाणपूल- (१०.१२ कोटी), बडनेरा गेट क्र. ७ फ्लायओव्हर - (३ कोटी), नांदुरा गेट क्र. २० उड्डाणपूल- (एख लाख), खंडवा गेट क्र. १६२ उड्डाणपूल- (एख कोटी), देवळाली गेट क्र. ९० उड्डाणपूल (६.६८ कोटी), चांदूर बाजार गेट क्र. ७० उड्डाणपूल- (४.०६ कोटी, कजगाव गेट क्र. १२६ उड्डाणपूल- (५० लाख),

रावेर खाल्ले क्र. १७१ उड्डाणपूल- (८.६७ कोटी), निंभोरा गेट क्र. १६९ उड्डाणपूल- (तीन कोटी), भादली गेट क्र. १४९ उड्डाणपूल- (९५ लाख), अमरावती गेट आणि उड्डाणपूल- (२.७८ कोटी), अमरावती गेट आणि उड्डाणपूल- (२.७७ कोटी).

ट्रॅक देखभाल दुरुस्ती २५५ कोटी

ट्रॅक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यमान सिग्नलिंग आणि दूरसंचार देखभालीची कामे (१२.५८ कोटी), बडनेरा- नवीन वॅगन कार्यशाळेचे बांधकाम-(४०.११ कोटी),

नाशिक- नवीन चाक कार्यशाळेचे बांधकाम (दहा कोटी), नवीन लिफ्ट आणि एस्केलेटर, फूट ओव्हर ब्रिज, सॉफ्ट अपग्रेडेशन आणि स्टेशन्सचा पुनर्विकास- (१८६ कोटी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT