Nashik Corona Updates  
नाशिक

नाशिकच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे १ हजार बळी; सर्वाधिक मृत्यू निफाड तालुक्यात

अरुण मलानी

नाशिक : कोरोनाचा फैलाव आता शहरी भागासह दुर्गम भाग व विरळ लोकसंख्या असलेल्‍या ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. इतकेच नव्,‍हे तर कोरोनाची लागण जिवावर बेतत असल्‍याचेही निदर्शनात येत आहे. नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण भागात सोमवार (ता. ५)पर्यंत एक हजार १७ बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापैकी सर्वाधिक १७८ मृत निफाड तालुक्‍यातील आहेत. त्‍यापाठोपाठ सिन्नर तालुक्‍यातील १३२ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. 

नाशिक व मालेगाव महापालिका वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागातही कोरोना पाय पसरवताना दिसत आहे. सोमवारपर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये ६४ हजार २३६ कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. यापैकी ५३ हजार ३४७ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्‍या मात केलेली आहे. तर नऊ हजार ८७२ बाधितांवर सद्यःस्‍थितीत उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित ग्रामीण भागातील लासलगाव (ता. निफाड) येथे आढळून आला होता. त्‍यानंतरच्‍या कालावधीत निफाडसह सिन्नर व येवला भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली होती. दुसरीकडे मालेगावलगत असलेल्‍या मालेगाव ग्रामीण, सटाणा, कळवण, देवळा या तालुक्‍यांमध्येही कोरोनाचा फैलाव वाढला होता. दुर्दैवाने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंच्‍या प्रमाणातही वाढ झाली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये एक हजाराहून अधिक बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

ग्रामीणचा मृत्‍युदर १.५८ टक्‍के 

मृतांच्‍या आकड्यांसोबत कोरोनाचा मृत्युदर नाशिक ग्रामीण भागाला चिंतेत टाकणारा आहे. नाशिक ग्रामीणचा मृत्‍युदर १.५८ टक्‍के इतका आहे. तुलनेत नाशिक महापालिका हद्दीतील मृत्‍युदर एक टक्क्यांच्‍या आत ०.९४ टक्‍के इतका आहे. निष्काळजीपणा, दुर्लक्ष व आरोग्‍य सुविधा वेळीच उपलब्‍ध होत नसल्‍याने ग्रामीण भागात मृत्‍युदराचे प्रमाण अधिक असल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. 

तालुकानिहाय आढळलेले बाधित व मृतांची संख्या 

सोमवार (ता. ५) पर्यंत 
तालुका एकूण कोरोनाबाधित मृत्‍यू 
नाशिक ८, ८३७ ११३ 
बागलाण ४,१४४ ७४ 
चांदवड ३,६७८ ५५ 
देवळा ३,३४२ ३७ 
दिंडोरी ३,५५३ ६५ 
इगतपुरी ३,५८६ ५९ 
कळवण १,७८८ २१ 
मालेगाव ३,६६५ ८९ 
नांदगाव ६,९८५ ९६ 
निफाड ११,२७४ १७८ 
पेठ २८० ६ 
सुरगाणा ४६६ ४ 
सिन्नर ८,५५० १३२ 
त्र्यंबकेश्‍वर १,७२५ १८ 
येवला २, ३६३ ७० 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT