Varieties of halwa on Tilvan festival & Manolkar family celebrating Tilavan festival
Varieties of halwa on Tilvan festival & Manolkar family celebrating Tilavan festival esakal
नाशिक

Tilvan festival : सासू- सुनेच्या नात्‍याची घट्ट गुंफण; सासू करतात सुनेचे अनोखे स्वागत!

सकाळ वृत्तसेवा

पल्‍लवी कुलकर्णी- शुक्ल : सकाळ वृत्‍तसेवा

नाशिक : संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सुवासिनी हळदीकुंकू, नववधू असेल तर सासू तिचा तिळवण सण साजरा करण्याची हिंदू धर्मियांत असलेल्या प्रथेत दोघांमधील नातेसंबंध अधिक घट्ट व्हावेत, मायेची पखरण व्हावी अशी अपेक्षा असते.

सध्या या सणाची धामधूम सुरू आहे. सासू आणि सुनेतील प्रेमसंबंध आणखी दृढ होत जावे व नात्‍यातील वीण घट्‌ट कशी करत जावी याविषयीचे वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन या तिळवण सणातून मिळत असते. (Tilvan festival close bond mother in law gives unique welcome to daughter in law nashik news)

मुलीचे लग्‍न झाले, की जावई व मुलीचे सण साजरे करतानाची माहेरची लगबग सुरूच असते. पूर्वी घरात येणारी नवरी मुलगी ही वयाने लहान असे. तिला कुटुंबातील नातलगांची ओळख, तसे त्‍यांची आवड–निवड, नविन घरातील परंपरा या साऱ्या सासूकडून शिकविल्‍या जात असे. मुलगी लहान असल्‍याने येणारा सण माहेरकडून साजरा करून मुलीशी होणारी भेट, तिची ओढ कायम टिकून राहत असे.

प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः।

तस्मात तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता।।

अर्थातः प्रिय वचनाने व आनंददायी वचनांनी सर्व प्राणी प्रसन्न होतात. त्यामुळे प्रिय वचन बोलण्यास कंजूषी करू नये.

तिळवण हा एकमेव सण असा आहे, की सासू सुनेसाठी करत असते. पूर्वी घरातील गृहिणी घर, मुले सांभाळणे त्‍यांचे प्रेमाने संगोपन करणे अशी तिची महती असे. अशातच तिला तिच्यातील कलेचे प्रदर्शन करता यावे यासाठी तिळवणासाठी लागणारा हलवा बनविण्याची कला आत्‍मसात असे.

सासू आपल्‍या लहानग्‍या सुनेला प्रेमाने, समजून सांगून तिच्या मार्गदर्शनाने मोठे करत असे. तयार झालेल्‍या हलव्याच्या विविध आकारापासून ही गृहिणी आपल्‍या सुनेसाठी गुंफणीतून वेगवेगळे छान असे दागिने तयार करत. सुनेने हलव्यातील गोडव्याप्रमाणे व गुंफणीप्रमाणे नाते गुंफत जावे अशी जणू शिकवण या तिळवण सणातून सासू तिला देत असते.

जावयासाठीही सासू हलवा, साखरेचे नारळ आणि हलव्याचा हार देऊन जावयाचा तिळवण साजरा करते. आपल्या समृध्द संस्‍कृती परंपरा, नात्‍यातील प्रेमळपणा कायमस्‍वरूपी टिकून राहावा म्‍हणून ॠतूनूसार थंडीत येणारी संक्रांत यामुळे शरीरासाठी आवश्‍यक असे स्‍निग्‍ध पदार्थ तिळ–गूळ, हलवा, तिळ–गूळाच्या पोळया याचे महत्त्व सिद्ध करत असते.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

इंदिरा नगर येथील मनोलकर कुटुंबीयांनी आपल्‍या नविन सुनेचा तिळवण सण नुकताच साजरा केला. यात सुनेने हलव्याचे दागिने परिधान करून येणाऱ्या सुवासिनींना हळदी कुंकवाचे वाण देत तसेच तिळ–गूळाच्या वडया वाटप करत एकमेकातील प्रेमळ संबंध जोपासत सण साजरा केला.

"सुनेला हलव्याचे दागिने घालताना तसेच तिला नटवितांना एक वेगळाच आनंद असतो. मुलीप्रमाणे तिला दागिने घालून तिचे सौंदर्य खुलत जाताना, अनुभवताना खूप आनंद वाटतो. नात्‍यातील गोडव्याचे वाण म्‍हणजेच आजचा तिळवण सण छान साजरा झाला."

- अनिता मनोलकर, सासू

"आईप्रमाणे नव्हे तर आई बनून सासूबाई घरातील परंपरा, आवडी निवडीप्रमाणे पदार्थ शिकवताना खूप छान वाटते व मजाही येते. त्‍यांनी आणलेले हलव्याचे दागिने खूप आवडले. आणि आतापर्यंत मुलगी होते आता ह्या घरची सून झाली ही जबाबदारीची भावनाही सूखद वाटते." - अनुजा मनोलकर, नववधू

"तिळवण सणाचे महत्‍व आज प्रत्‍यक्ष जाणून घेतल्‍याने आपल्‍यावरची जबाबदारीची जाणीव झाली. तसेच तिळ–गुळाप्रमाणे दोन्ही कुटुंबाची गुंफण व प्रेम सदैव टिकविण्याचा नेहमीच प्रयत्‍न करेन."

- कुणाल मनोलकर, जावाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT