नाशिक : व्यापारी व उद्योजकांच्या अडचणी व सूचना सरकारपर्यंत पोचवून त्यातून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करेन, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उद्योजकांना दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीतर्फे संचारबंदीमुळे लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेऊन व्यापार व उद्योगांच्या अडचणी, टाळेबंदी दूर झाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरील उपायांबाबत विचार करण्यासाठी ई-चर्चासत्र झाले. त्या वेळी श्री. झिरवाळ बोलत होते.
मुख्यमंत्री व संबंधित मंत्रिमहोदयांनी चर्चा करून अडचणीतून मार्ग काढणार
ते म्हणाले, की संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी उपक्रम स्तुत्य आहे. शासनाच्या आदेशांच्या अंमलबजावणीतील अडचणीबाबत सरकारशी तातडीने बोलेन. व्यावसायिकांच्या अडचणींबाबत मुख्यमंत्री व संबंधित मंत्रिमहोदयांनी चर्चा करून अडचणीतून मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न असेल. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात राज्यातील सर्व विभागांतील विभागीय चेंबर्स आणि त्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. श्री. मंडलेचा यांनी संचारबंदीत लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग, तसेच व्यापारी व शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणींबाबत श्री. झिरवाळ यांचे लक्ष वेधले. संचारबंदीनंतर उद्योजकांना खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे व्यवसायकर, कामगार निधी व ईएसआयसीचा मोठा निधी सरकारकडे जमा आहे. त्याचा उपयोग कामगारांच्या वेतनासाठी व उद्योजकांच्या खेळत्या भांडवलासाठी व्हावा, अशी मागणी केली.
राज्यातील शंभरपेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी चर्चेत सहभागी
एमएसएमई उद्योगांना प्रामुख्याने भांडवल उभारणी, कामगार नसणे, व्याजदर, बॅंकांचे कर्ज मिळणे, वीजबिल, पाणीबिल व विविध कर, कामगारांचे पगार, निर्यातीसाठी चालना मिळावी याकरिता प्रयत्न करणे, कृषिमाल काढण्यासाठी मजुरांची उपलब्धता याविषयीच्या अडचणी मांडून उद्योगांच्या उभारीसाठी विशेष पॅकेजची मागणी केली. चर्चासत्राचे संचालन चेंबरचे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांनी केले. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार मानले. राज्यातील शंभरपेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी चर्चेत सहभागी झाले होते.
हेही वाचा > धक्कादायक! रागाच्या भरात 'त्याचे' हात देखील थरथरले नाही...बायकोला तर पेटवलंच अन् स्वत:देखील...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.