goats 
नाशिक

बकरी ईदच्या 'कुर्बानी'साठी अडीच लाख बोकड शेतातच...एवढे बोकड विकावेत कुठे? मोठा प्रश्न

सकाळवृत्तसेवा

नाशिक/मालेगाव : कोरोनामुळे बकरी ईद साध्या पद्धतीने घरातच साजरी होणार आहे. त्याचा फटका गाेटफार्मला बसणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जवळपास ५०० गोटफार्ममध्ये दहा महिन्यांपासून बकरी ईदच्या कुर्बानीसाठी तयार होत असलेले राजस्थानमधील सोजन जातीचे अडीच लाख बोकड पडून आहेत.

अडीचशे तरुण शेतकरी गोटफार्ममध्ये गुंतले

देशातील सर्वांत मोठे असलेले मुंबईतील देवनार मार्केट मंदावले आहे. कुर्बानीसाठी ४० ते ५० हजारांचा बोकड घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे गोटफार्ममध्ये शेळीपालन करणाऱ्या शेकडो तरुण शेतकऱ्यांना किमान दहा कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. बकरी ईदसाठी मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी भागातील मुस्लिम बांधव सोजन जातीच्या बोकडाला प्राधान्य देतात. ही बाब हेरून नाशिक जिल्ह्यातील जवळपास अडीचशे तरुण शेतकरी गोटफार्ममध्ये गुंतले आहेत. उत्तर महाराष्ट्रात ही संख्या पाचशेच्या आसपास आहे. शेतकऱ्यांनी १० ते १२ हजार रुपयांना चार महिने वयाचे एक याप्रमाणे बोकड राजस्थानातून आणले. चार महिन्यांचे असताना, सोजन जातीच्या बोकडाचे वजन २० ते २५ किलो असते. आठ ते दहा महिने संगोपन केल्यानंतर त्याचे वजन ७० ते ९० किलो हाेते. बोकड, वाहतूक खर्च व संगोपन असा सुमारे २५ ते २७ हजारांपर्यंत एका बोकडासाठी खर्च येतो.

एवढे बोकड विकावेत कुठे? मोठा प्रश्न

बकरी ईदला तो ४० ते ५० हजारांपर्यंत सहजासहजी विकला जातो. एका गोटफार्ममध्ये ४० ते १०० बोकडांचे संगोपन केले जाते. बकरी ईदच्या महिन्यापूर्वीच या बोकडांची खरेदी-विक्री सुरू होते. यंदा कोरोनामुळे मुंबईत बोकडांची खरेदी-विक्री दिसत नाही. मुस्लिम बांधवांची आर्थिक परिस्थिती लॉकडाउनमुळे खालावली आहे. शासनाने घरातच ईद साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत एवढे बोकड विकावेत कुठे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. कुर्बानीसाठी बोकड खरेदी करणाऱ्या नागरिकांचा कल आठ ते दहा हजारांना मिळणाऱ्या गावठी बोकड खरेदीकडे असेल.

असा आहे बोकड

सोजन जातीचा बोकड आकर्षक दिसतो. पांढऱ्या व गुलाबी रंगाने तो सहज नजरेत भरतो. त्यामुळे कुर्बानीसाठी या बोकडाला सर्वाधिक पसंती असते. कुर्बानीसाठी बोकड विकले गेले नाहीत, तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. नाइलाजाने किरकोळ विक्रेत्यांना ते विकावे लागतील. बोकडाची कातडी व इतर वेस्टेज पाहता किरकोळ विक्रेते त्याचे निम्मेच वजन ग्राह्य धरतात. यामुळे मुंबई वगळता राज्यातील इतर भगात हा बोकड १५ ते २० हजारांना विकला जातो. किरकोळ विक्रेत्यांकडून त्याला फारशी मागणी नसते. त्यामुळे गोटफार्म व्यावसायिक संकटात येण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे गोटफार्म शेतकरी उद्‌ध्वस्त होत आहेत. सोजन जातीच्या बोकडांना लहान मुलांसारखे सांभाळावे लागते. कर्ज काढून तरुण शेतकऱ्यांनी गोटफार्म सुरू केले. बोकड पडून आहेत. दुसरीकडे हप्ते भरण्यासाठी बँकांकडून तगादा सुरू आहे. शासनाने मदत करावी, अन्यथा तरुण शेतकरी शेतीपासून दूर जाऊन वैफल्यग्रस्त होतील. - प्रमोद निकम, संचालक, कुबेर गोटफार्म, दाभाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT