Bike Thief arrested
Bike Thief arrested esakal
नाशिक

Nashik Crime News : दोघे दुचाकी चोरटे जेरबंद; 4 लाखांच्या 9 दुचाकी जप्त

नरेश हाळणोर

नाशिक : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना, अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने दोघा दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या ३ लाख ९० हजार रुपयांच्या ९ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. संशयितांनी या दुचाक्या सिडकोसह इंदिरानगर, मालेगाव परिसरातून चोरल्या असून, त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (Two Bike thieves jailed 9 bikes worth 4 lakhs seized Nashik Latest Crime News)

सचिन अनिल हिरे (२६, मूळ रा. दाभाडी, कारखाना रोड, मालेगाव), प्रमोद दिलीप बच्छाव (३५, रा. दोघे मोरवाडी, सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. उत्तमनगर येथील ओमकार राधाकृष्ण पेंढारकर (रा.शिवपुरी चौक) यांची दुचाकी (एमएच १५ जीई ५४९२) गेल्या १७ ऑगष्ट रोजी चोरीला गेली होती. सकाळच्या सुमारास घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याने याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिडकोसह औद्योगीक वसाहतीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने अंबड पोलिस चोरट्यांच्या मागावर होते.

पोलिस शिपाई योगेश शिरसाठ व येवले यांना दोघा दुचाकी चोरट्यांची खबर मिळाली होती. संशयितांकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, निरीक्षक नंदन बगाडे आणि श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावून दोघांना जेरबंद केले. दोघा संशयितांकडून चोरीच्या ९ दुचाक्या पोलिसांच्या हाती लागल्या. पोलीस चौकशतून संशयितांनी अंबडमधून चार, इंदिरानगरमधून दोन व मालेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे तीन असे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

या दुचाक्या लागल्या हाती

*अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या दुचाक्या : टीव्हीएस स्टार (एमएच १५ एफआर ७१३६), पॅशन प्रो (एमएच १५ जीई ५४९२), स्प्लेंडर (एमएच १५ बीएम ६५४२), हिरो होंडा पॅशन प्लस

* इंदिरानगर : पॅशन (एमएच १५ बीसी २८३६), पॅशन प्रो (एमएच १५ डीएफ ३३२२)

* मालेगाव : स्प्लेंडर (एमएच ४१ एएच ४५७२), स्प्लेंडर, डिस्कव्हर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT