malegao drown3.jpg 
नाशिक

केवळ एका दुर्दैवी घटनेने 'त्या' दोन भावांचे स्पप्न राहिले कायमचे अपूर्ण..कुटुंबियांवर शोककळा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : यावर्षी परिसरात चांगला पाऊस झाला आहे. परिणामी शेततळ्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे. सोनवणे बंधूंच्या शेतात कांदे व जनावरांना चारा पिकांना पाणी भरायचे काम चालू होते. वीज नसल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पाण्याचे नियोजन करावे लागते. परिसरातील वीज उपलब्धतेचा पूर्णता बोजवीरा उडालेला आहे.अशातच एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

असा घडला प्रकार
सोनवणे बंधूचे शेत गावापासून दक्षिणेकडे मालेगाव रस्त्याकडे आहे. वीजपुरवठा खंडीत असल्याने शेततळ्यातील पाणी हे पाईप जोडून हवेचा दाब निर्माण करत उतारच्या दिशेने विहिरीत टाकण्यासाठी दोघेही भाऊ प्रयत्न करत होते. याच गडबडीत लहान भाऊ ज्ञानेश्वर तळ्यात पडला. हे पाहताच किशोरने जवळ पडलेली ठिबकची नळी कंबरेला बांधत त्याला काढण्याचा प्रयत्न करू लागला. घाईगडबडीत नळीचा पाईपाला वरती बांधलेला वेढा सुटला व तोही पाण्यात बुडाला. शेततळ्यात वीस ते पंचवीस फूट पाणी होते. दुर्दैवाने दोघांना पोहता येत नसल्याने दोघांचा मृत्य झाला. ही घटना आजूबाजूला समजताच शेतकऱ्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते.

वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद

रामपूरा (ता. मालेगांव) येथील किशोर मुरलीधर सोनवणे (वय ३१) व ज्ञानेश्वर मुरलीधर सोनवणे (वय २५) या दोन्ही भावडांचा आपल्याच शेतातील शेततळ्यात बूडून आकस्मिक मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता.3) सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, सहाय्यक पोलिस निरिक्षक आर. डी. मातोळे पुढील तपास करत आहेत.

सोनवणे परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
किशोर हा कंक्राळे येथील विनाअनुदानित माध्यमिक शाळेवर बिनपगारी शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यांना पत्नी व दिड वर्षांचा लहान मुलगा आहे तर ज्ञानेश्वर हा अविवाहित होता. आई जिजाबाई अपंग तर वडील मुरलीधर वृद्ध आहेत. घरातील दोन्हीही कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूने सोनवणे परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saving Scheme : सरकारी हमीची सुरक्षित गुंतवणूक योजना! मिळेल ८२,००० रुपये व्याज आणि १.५ लाखांची करसवलत

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, प्रलंबित बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार, तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार?

Latest Marathi News Live Update : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

Thane Politics: काँग्रेसला जबर धक्का! ११ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात दाखल

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा हट्ट अन् भिकेला लागले खेळाडू... BCCI शी पंगा घेणं पडलं महागात, याला म्हणतात 'तोंड दाबून बुक्क्याचा मार'...

SCROLL FOR NEXT