Uddhav Thackeray esakal
नाशिक

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लवकरच नाशिकच्या मैदानात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये येत आहे. (Uddhav Thackeray soon in Nashik Maidan nashik political news)

ठाकरे यांच्या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच नवीन नियुक्त्यांची शक्यता आहे.जून महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपसोबत घरोबा करताना सत्तादेखील स्थापन केली.

त्यानंतर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असा सरळसरळ सामना रंगला. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याची भूमिका घेतली. संघटनेच्या चिन्हावरच त्यांनी दावा केल्यानंतर वाद टोकाला गेला.

शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या मुंबई, ठाणे नाशिक व औरंगाबाद या प्रमुख शहरांकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मुंबई सोडलेली नाही. मात्र, आता नववर्षाचे निमित्त साधून ते पक्षाच्या बालेकिल्ल्याची डागडुजी करण्यासाठी मैदानात उतरत आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये संघटना बळकटीसाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी नाशिकमध्ये दोन दिवसाचे नियोजन केले आहे.

शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ४) मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी नाशिकला येणार असल्याचे सांगितले. अशी माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

U19 Asia Cup: १७ चौकार, ९ षटकार अन् डबल सेंच्युरी! भारताच्या अभिज्ञान कुंडूने रचला इतिहास, कोणालाच न जमलेला केला पराक्रम

Jio Recharge Offer : महिन्याचा रीचार्ज फक्त ₹103! मोफत OTT आणि AI सब्स्क्रिप्शन; Jio चे Happy New Year साठी 3 जबरदस्त प्लॅन

Latest Marathi News Live Update : लातूर तालुक्यात डोंगर पोखरून जमिनीची चाळण; तहसीलदारांचे दुर्लक्ष, मंत्री बावनकुळे आज लातूर दौऱ्यावर, कारवाई होणार का?

Chandrapur : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी; सावकारकीचा अमानवी चेहरा समोर..

SCROLL FOR NEXT