Unseasonal rains damaged onion wheat and gram crops nashik news  esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाने कांदा, गहू, हरभरे पिकांना फटका..! अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते

सिन्नर : आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. कोकणाला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

असेच पावसाचे वातावरण असल्याने बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या पुढे सिन्नर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सगळीकडे पाणीच झाले होते. (Unseasonal rains damaged onion wheat and gram crops nashik news )

अवकाळी पाऊस कोसळला. पाऊस सुरू झाल्यामुळे शहरातील बत्ती पहाटे गुल झाली होती. जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा मात्र धास्तावला आहे. कारण या पावसामुळं हातातोंडाशी आलेली पीकं वाया जाण्याच शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाने बागांना फटका बसला. आंबा, द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच अनेक ठिकाणी कांदा लागवड सुरू असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले आहे त्यामुळे कांदा रोप तसेच रब्बी पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला असून शेतकरी राजावर पुन्हा एक मोठे संकट ओढवले आहे.

पहाटे आलेल्या अचानक अवकाळी पावसामुळे बळीराजाला धावपळ करावी लागली. पहाटेच्या सुमारास पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.

अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असून सर्दी, खोकला, ताप असे आजार बळकवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी सर्दी, खोकला होऊ नये यासाठी कान, नाक शरीरावर गरम कपडे वापरावे तसेच साधी पाण्याची वाफ घ्यावी व आरोग्याच्या तक्रारी वाढल्यास परस्पर औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

''अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकांना मोठं फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या पावसामुळे शेतात असलेल्या कांदा पात याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होणार असून गहू, हरभरा यांच्यावरही या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने औषधे फवारणी करावी लागणार आहे. सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. याचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत आहे.''-अमोल गोळेसर, युवा शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT