nashik station.png
nashik station.png 
नाशिक

वीजप्रकल्पासाठी नाशिक सोडून उरण वायुकेंद्राचा विचार; नाशिककरांमध्ये अन्यायाची भावना 

नीलेश छाजेड

एकलहरे (नाशिक) : नुकतेच ग्रिड फेल होण्याने मुंबईवर जे संकट कोसळले होते, तसे भविष्यात होऊ नये याकरिता उरण येथे एक हजार मेगावॉटचा वायू प्रकल्प घोषित करण्यात आला. मुळात नाशिकला सर्व सुविधा उपलब्ध असताना पुन्हा एकदा नाशिकचा विचार न करता अन्याय करण्यात आल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. 

नाशिक सोडून उरण वायुकेंद्राचा विचार 
कळवा-पडघा लाइनमध्ये १२ ऑक्टोबरला बिघाड झाल्याने मुंबईची बत्ती गुल झाली होती. त्यावर पर्याय काढण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उरण वायू केंद्र येथे एक हजार मेगावॉटचा प्रकल्प घोषित केला. नाशिक औष्णिक वीज केंद्र येथे मुबलक जागा, रेल्वे, पाणी व राख साठवण बंधारा आदी सर्व सुविधा उपलब्ध असताना व सर्वांत महत्त्वाचे नाशिक ते मुंबईमधील रॅडियल डिस्टन्स अवघे शंभर ते सव्वाशे किलोमीटर असताना नाशिक ते पडघा लाइन महत्त्वाची ठरू शकते. उपलब्धता/तुटवडा याचा विचार न करता उरण किती सयुक्तिक ठरू शकते हाही अभ्यासाचा विषय आहे. 
मुंबईमध्ये जागांचे भाव गगनाला भिडलेले असताना नाशिकला सर्व सेटअप रेडी असल्याने ६६०×२ किंवा २५०×२ चा विचार होणे आवश्यक आहे. 

प्रतिकूल उरणला परवानगी कशी? 
उरण प्रकल्पात आताही वीजनिर्मिती वाढविता येऊ शकते. पण केंद्र सरकार गॅस उपलब्ध करून देत नाही. मुंबई उपनगरात होणाऱ्या प्रदूषणामुळे या प्रकल्पाची निर्मितीक्षमता वाढविणे शक्य होणार नाही. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी असे कसे जाहीर केले, असा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना पडला आहे. 


नाशिककरांमध्ये अन्यायाची भावना 
राज्यात इतरत्र वीज प्रकल्पांना विरोध होत असताना नाशिक येथे दहा वर्षांपासून बदली संचासाठी पाठपुरावा सुरू असताना उरण येथे प्रकल्पास मान्यता मिळते व नाशिकला डावलले जात आहे. -चंद्रशेखर आहेर, सचिव, प्रकल्प बचाव संघर्ष समिती 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT