Vande Bharat Express esakal
नाशिक

Vande Bharat Express : वंदे भारत रेल्वेला साई भक्त प्रवाशांची प्रतिक्षा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुभारंभ केलेल्या बहुचर्चित वंदे भारत रेल्वेला प्रवाशांची प्रतिक्षा आहे.

गाडी सुरू झाल्यापासून अजून शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही. (vande bharat express get only 75 percent passenger response nashik news)

मुंबईतील साई भक्तांसाठी थेट सुरु झालेल्या रेल्वेला रोज सरासरी ७५ ते ७७ टक्केच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे साई भक्तांची वंदे भारत रेल्वेवर कृपा व्हावी, अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे.

मध्य रेल्वेने वंदे भारत सुरू केली. मुंबईला जाणाऱ्या साई भक्तांसाठी सुरु करण्यात आलेल्या या नव्या कोऱ्या रेल्वेत अनेक चांगल्या सुविधा आहेत. देशात एकाचेवळी वेगवेगळ्या भागात सुरु झालेल्या या रेल्वेगाड्याना प्रतिसाद असला तरी, शिर्डीला जाणाऱ्या गाडीला मात्र अपेक्षित प्रतिसाद नाही.

गेल्या आठवड्यात अवघ्या एकच दिवस रेल्वेला हजाराहून अधिक प्रवासी लाभले. अतिशय अद्ययावत सुविधांनी युक्त असलेल्या वंदे भारतला साई भक्तांचा प्रतिसाद मिळावा, ही रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

नाशिक- मनमाडची गर्दी

मुंबईहून येताना शिर्डीचे साई भक्तांची डोळ्यासमोर ठेऊन रेल्वेच्या वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, शिर्डीहून मुंबईला परतीच्या प्रवासाला जर नाशिकच्या उद्योजक, व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले तर मनमाड ते नाशिकहून प्रवासी मिळू शकतील.

मनमाड हे जंक्‍शन असले तरी वंदे भारतला मनमाडचा थांबा नाही. त्यामुळे इतर भागातून मनमाडला येऊन शिर्डीला जाऊ इच्छिणाऱ्या हजारो भाविकांना वंदे भारत रेल्वेचा लाभ घेताच येत नाही. मनमाडला रेल्वेसाठी सुविधा उभाराव्यात.

नाशिक दर्शन गाडीशी तसेच मुंबईला सकाळी पोहोचू शकेल, अशा स्वरूपाच्या वंदे भारतच्या वेळा सुसंगत कराव्यात. वंदे भारत रेल्वेसाठी मुंबईहून येताना तेथील साई भक्त डोळ्यासमोर ठेऊन वेळा केल्या तर परतीसाठी नाशिक मनमाडच्या प्रवाशांना डोळ्यासमोर ठेऊन वेळा असाव्यात, अशी मागणी आहे.

तारीख प्रवासी संख्या प्रतिसाद टक्के

११ फेब्रुवारी ५२८ ४६.८ टक्के

१२ फेब्रुवारी ११५८ १०२.० टक्के

१३ फेब्रुवारी ७३४ ६५.७ टक्के

१५ फेब्रुवारी ५८७ ५२.०२ टक्के

१६ फेब्रुवारी ५३५ ४७.५२ टक्के

१७ फेब्रुवारी ६७३ ५९.६६ टक्के

१८ फेब्रुवारी ८६७ ७६.८६ टक्के

अंतर २३७ कि.मी , वेळ २ तास ३७ मिनीटे, भाडे ६०० रुपये (चेअर कार), एसी बोगी १२०० रुपये

"मुंबईतील भाविकाला रात्री रेल्वेत आराम करून एका दिवसात शिर्डीला दर्शन करून पुन्हा माघारी फिरता यावे. या नियोजनाने वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात आली आहे. मात्र आठवड्यात हे चित्र बघता, अजूनही रेल्वेला शंभर टक्के प्रतिसाद नाही. मुंबईतील भाविकांची रेल्वेगाडीचा आनंद घ्यावा." - अनिल बागले , सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT