Nashik News  esakal
नाशिक

Nashik News: ‘वसाका’ निवृत्त कर्मचारी पगार न मिळाल्याने आक्रमक; अनेकांंवर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : विठेवाडी (लोहणेर, ता.देवळा) येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तत्काळ अदा करावी, अशी आग्रही मागणी निवृत्त कामगार युनियनतर्फे धाराशिव प्रशासनाकडे केली आहे.

मागील पाच वर्षापासून वसंतदादा सहकारी साखर कारखाना पंढरपूर येथील धाराशिव साखर कारखाना प्रशासनाने भाडेतत्वावर चालविणेसाठी घेतला आहे. त्यावेळी एमएससी बँकेच्या व कामगार युनियनच्या करारानुसार धाराशिव कारखान्याने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे पीएफ, पेन्शन, पगार व इतर देणे आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक होते.

परंतु प्रशासनाने याबाबत अद्यापही कोणतीही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांचे पीएफ, पेन्शन व पगार मिळत न झाल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळी आली आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

यासंदर्भात सेवानिवृत्त कामगार युनियनने धाराशिव प्रशासनाची भेट घेऊन वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र धाराशिव प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱ्‍यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वसाकाच्या निवृत्त कामगार आर्थिक संकटात सापडला असून संतापाची भावना निर्माण झालीय आहे.

याबाबत युनियनचे सरचिटणीस रवींद्र सावकार, हिरामण बिरारी, विलास सोनवणे आदींनी कारखाना कार्यस्थळावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस जवळपास २०० निवृत्त कामगार उपस्थित होते.

बैठकीत कामगारांना मागण्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर सर्व कामगारांनी धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील व संचालकांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. श्री.पाटील यांनी आमदार राहुल आहेर व धाराशिवचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी रवींद्र सावकार, हिरामण बिरारी, विलास सोनवणे, सतीश शिरोडे, अरविंद सोनवणे, अशोक देवरे, प्रताप सोनवणे, प्रताप देवरे, शांताराम निकम, सुभाष पवार, कुबेर जाधव, व्यंकट पवार आदींसह कामगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT