stray dogs
stray dogs  esakal
नाशिक

भटक्या श्‍वानांमध्ये त्वचारोगाची वाढ; संसर्गाची भीती

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा (जि. नाशिक) : शहरासह ग्रामीण भागातील हजारो भटक्या श्‍वानांना त्वचारोग जडला आहे. या श्‍वानांच्या संपर्कात येणाऱ्या अन्य श्‍वानांमध्येही संसर्ग होऊन त्वचारोग झपाट्याने पसरत आहे. भटके श्‍वान (stray dogs) या आजारास बळी पडत असल्याने पशुवैद्यकीय विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.

भटक्या श्‍वानांची संख्या मोठी

खरूज त्वचारोगाची लागण या श्‍वानांच्या संपर्कात आलेल्या अन्य श्‍वानांनाही होत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीही या त्वचारोगाचे प्रमाण वाढले होते. हजारो श्‍वानांपैकी सुमारे पाच ते दहा टक्के श्‍वानांना त्वचारोग आहे. श्‍वानांची संख्या लक्षात घेता प्रत्येकाला पकडून त्यांच्यावर उपचार करणे कठीण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त श्‍वानांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे. त्वचारोग झालेल्या श्‍वानांना वेळीच उपचार मिळाले व योग्य देखभाल केली, तर ते बरे होऊ शकतात. मात्र, पाळीव श्‍वानांची जशी काळजी घेतली जाते, तशी भटक्या श्‍वानांची घेतली जात नसल्याने संसर्गाची भीती आहे.

अशी आहेत लक्षणे...

श्‍वानांच्या शरीरावर पिसवा, गोचीड आणि खरूज दिसून येते. अंगावरील केस गळून पडणे, त्वचा घासून लालसर व कोरडी पडणे. काही श्‍वान मरणासन्न अवस्थेत दिसून येणे.

"त्वचारोग झालेल्या भटक्या श्‍वानांना पकडून त्यांच्यावर पशुचिकित्सालयात उपचार करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे त्वचारोग झालेले श्‍वान दिसल्यास त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे." - पंकज आहेर, देवळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT