Election
Election  Esakal
नाशिक

Election News : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीसह 5 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नाशिक पदवीधरसह राज्यातील विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ५ जानेवारीला अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम १२ जानेवारीपर्यंत असेल.

३० जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. (Voting on January 30 for 5 seats including Nashik degree of Legislative Council Election News)

विधानपरिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर, औरंगाबादसह नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी १३ जानेवारीला होईल. १६ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त उन्मेष महाजन यांनी निवडणूक कार्यक्रम आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली. तसेच आचारसंहिता अंमलबजावणीबाबत विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी (ता. ३०) दुपारी साडेतीनला बैठक होत आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधरमधून डॉ. सुधीर तांबे, अमरावतीमधून डॉ. रणजित पाटील, औरंगाबादमधून विक्रम काळे, नागपूरमधून नागोराव गाणार, कोकणमधून बाळाराम पाटील हे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करत होते.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

नाशिक जिल्ह्यात ६६ हजार मतदार

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे निवडणूक अधिकारी असतील. तसेच विभागातील पाच जिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.

या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात ६६ हजार ७०९ मतदार असतील. मतदान केंद्राची यादी शुक्रवारी (ता. ३०) प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी जिल्हा निवडणूक शाखा आणि तहसीलदार कार्यालयात उपलब्ध असेल. या यादीवर ५ जानेवारीपर्यंत हरकत घेता येईल. ही हरकत जिल्हा निवडणूक शाखेत सादर करावी लागेल.

तालुकानिहाय मतदान केंद्र आणि मतदारांची संख्या अनुक्रमे याप्रमाणे : सुरगाणा-४-१ हजार १५०, कळवण-३-२ हजार ७९, देवळा-३-२ हजार ३८७, बागलाण-९-५ हजार २८५, मालेगाव-६-५ हजार ३०९, नांदगाव-४-२ हजार २१०, येवला-४-२ हजार ७८१, चांदवड-४-२ हजार ६९६, निफाड-९-६ हजार ७९५, दिंडोरी-६-३ हजार ३८३, पेठ-२-७१४, नाशिक-३०-२२ हजार ४०९, त्र्यंबकेश्‍वर-२-६६३, इगतपुरी-४-२ हजार २७१, सिन्नर-९-६ हजार ५७७.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT