Waiting for rain all over Trimbakeshwar including Ghatmatha nashik news
Waiting for rain all over Trimbakeshwar including Ghatmatha nashik news esakal
नाशिक

Nashik Rain Update : घाटमाथ्यासह त्र्यंबकेश्‍वरच्या सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम

कमलाकर अकोलकर

Nashik Rain Update : अधिक-श्रावणानिमित्त देशभरातील शिवभक्तांची पावलं ज्योतिर्लिंगासह संत निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी वळताहेत.

अशा तीर्थक्षेत्राच्या घाटमाथ्यासह गेल्या काही दिवसांमध्ये वरुणराजा हजेरी लावत असला, तरीही सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (Waiting for rain all over Trimbakeshwar including Ghatmatha nashik news)

घाटमाथ्यावरील पावसामुळे आदिवासी भागातील भात, नागलीच्या लागवडीला वेग येणार असला, तरीही ही पिके पावसाने खंड दिल्यास तग धरतील काय इथंपासून ते उत्पादनात घट येणार नाही इथपर्यंतच्या प्रश्‍नांनी आदिवासी शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

त्र्यंबकेश्‍वर भागात दमदार पाऊस नसल्याने जलाशये तुडूंब भरलेली नाहीत. या भागात सदैव अधिकचा पाऊस होत राहिला आहे. जून-जुलैमध्ये जोरदार होणाऱ्या पावसामुळे जलाशये ओसंडून वाहतात. त्यामुळे गौतमी गोदावरीसह गंगापूर धरणात जलसाठा वाढून नाशिक आणि नगर जिल्ह्यातील तहानलेल्या गावांप्रमाणेच शेतीचा प्रश्‍न मार्गी लागतो.

दरम्यान, ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावणारी गोदावरी राजमहेंद्री येथे सागराला मिळते. दक्षिण भारतातील या गंगा गोदावरीने १ जुलैला शहरातून प्रवेश केला. त्यानंतर आजअखेर रिमझिम पाऊस आणि एखादी-दुसरी सर असे पावसाचे स्वरूप राहिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रह्मगिरी पर्वतावरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे अहिल्या पाझर तलाव भरला आहे. मात्र शहरातील गंगासागर, गौतम तलाव, इंद्रतीर्थ अशी जलाशये निम्मी भरलेली नाहीत. अशा परिस्थितीमुळे साऱ्यांना जोरदार पावसाची आशा लागलेली आहे. तसे घडण्यातून वर्षभरातील पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. अन्यथा यंदाचा कोरडा पावसाळा वर्षभर साऱ्यांना चिंतातूर बनविल्याखेरीज राहणार नाही.

आकडे बोलतात

- गेल्या वर्षी त्र्यंबकेश्‍वरमध्ये दोन हजार ५५१ आणि तालुक्यात दोन हजार ७१४ मिलिमीटर पाऊस

- गेल्या वर्षी २१ जुलैपर्यंत त्र्यंबकेश्‍वरमध्ये एक हजार २८४ आणि तालुक्यात एक हजार ५१५ मिलिमीटर झाला होता पाऊस

- यंदा आजअखेरपर्यंत त्र्यंबकेश्‍वरमध्ये ७५७ आणि तालुक्यात ५३५ मिलिमीटर झालाय पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 1 जून 2024

Latest Marathi News Live Update: शेटवच्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरूवात

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT