Hair Transplant esakal
नाशिक

Hair Transplant : अकाली टक्कलवर मात करायचीय? हेअर ट्रान्सप्लांट आहे काळाची गरज

सकाळ वृत्तसेवा

हेअर ट्रान्सप्लांट सध्या काळाची गरज ठरत आहे. आजच्या युगात केस गळणे, अकाली टक्कल पडणे अशा अनेक गोष्टींनी आजची युवा पिढी त्रस्त आहे. केस गळण्याने अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण होत आहे.

आधीच्या काळात चाळिशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, बदलत चाललेली जीवनशैली या सर्वांमुळे विशीतच यायला लागले आहे.

"टक्कल पडले, की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो. त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम दिसायला लागतो. हा गेलेला आत्मविश्वास हेअर ट्रान्सप्लांट करून परत मिळविता येतो. पण हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट हे कितपत प्रभावी आहेत, हा प्रश्न प्रत्येक रुग्णाच्या मनात येतो आणि अशाच प्रश्नांची आज आपण उत्तर देणार आहोत." - डॉ. मनोज बच्छाव, प्लास्टिक ॲन्ड कॉस्मेटिक सर्जन

(Want to overcome premature baldness Hair transplant nashik news)

हेअर ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट किती आहे व तो कोणत्या बाबींवर अवलंबून आहे?

- हेअर ट्रान्सप्लांट अतिशय यशस्वी अशी उपचार पद्धती आहे. पण तिचा सक्सेस रेट हा काही गोष्टींवर अवलंबून आहे, जसे की

सर्जनचे अनुभव व कौशल्य ः कारण तुमचा सर्जन ठरवतो किती टक्कल आहे, त्याला किती ग्राफ्ट लागतील व ते डोनर एरियामधून कशा पद्धतीने काढले जावेत. काढताना केसांच्या मुळाला धक्का न लागता काढले जावेत. जेणेकरून काढला जाणारा प्रत्येक केस यशस्वीपणे टक्कल असलेल्या जागी उगवला पाहिजे.

शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे मशिनरी : हेअर ट्रान्सप्लांटमध्ये वापरली जाणारी मशिनरी ही अतिशय महत्त्वाची असते. केस मुळासकट काढण्यासाठी वापरली जाणारी मायक्रोमोटर, त्याचा स्पीड, वापरले जाणारे पंचेस हे किती शार्प आहेत यावरही काढल्या जाणाऱ्या केसांच्या मुळाची गुणवत्ता अवलंबून असते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

हेअर ट्रान्सप्लांटचे काही कॉम्प्लिकेशन आहेत का?

हेअर ट्रान्सप्लांट ही अतिशय सेफ सर्जरी आहे. पण त्यासाठी आपण कुठे सर्जरी करत आहोत, स्वतः सर्जन आपली सर्जरी करत आहे का, ओटी सेटअपमध्ये आहे का, सर्व इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स फॉलो करून शस्त्रक्रिया केली जात आहे का,

हेअर ट्रान्सप्लांट आधी मेडिकल व्हॅल्युएशन व फिजिकल फिटनेस करून घेण्यात आली आहे का, शस्त्रक्रियेदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यास इमर्जन्सी बॅकअप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे का, या सर्व बाबींची उत्तम चौकशी करून हेअर ट्रान्सप्लांट केल्यास १०० टक्के यशस्वी होऊ शकते व कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT