village.jpg 
नाशिक

सकाळीच जन्मलेले वासरु मध्यरात्रीतून होते गायब तेव्हा? परिसरात खळबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (देवपूर) मध्यरात्रीची वेळ...गाढ झोपत असतांनाच अचानक गाईच्या जोराजोरात हंबरण्याचा आवाज झाला. मोतीराम गडाख खडबडून जागे झाले. सकाळीच जन्मलेले वासरु गायीजवळून गायब? सुरुवातीस वासरू गायीजवळ नसल्याने गडाख गोंधळलेच. शोधा शोध सुरु केली असता धक्काच...

अशी घडली घटना

देवपूर येथील शेतकरी मोतीराम मुकुंदराव गडाख यांचे गावालगत घर असून घराजवळच जनावरे बांधलेली होती. नुकतेच जन्म झालेले एक दिवसाचे वासरू गायी जवळ बांधलेले होते. रात्री मोतीराम गडाख बाहेर झोपलेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला. सुरुवातीस वासरू गायीजवळ नसल्याने गडाख गोंधळलेच. डोक्यात तर्क-वितर्क सुरु झाले. आजूबाजूचा सर्व परिसरात शोधून झाले, मात्र वासरु काही दिसलेच नाही. सकाळी वासराचा जन्म झाला व त्याच रात्री वासरु गायब? वासरु बिबट्यानेच वासरू फस्त केल्याचा संशय आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. 

वासरास बिबट्याने पूर्ण फस्त केलेले असल्याने बिबट्याचं असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला. परिसरात मका शेतीमुळे बिबट्या या परिसरात आश्रयास असण्याची शक्यता आहे . रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांमध्ये घबराट पसरली असून सावधगिरी बाळगत आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

Accident News : हृदयद्रावक घटना! लोहोणेरजवळ मिक्सर गाडीखाली चिरडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Uddhav Thackeray : सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा- उद्धव ठाकरे!

SCROLL FOR NEXT