Minister of Public Works Ravindra Chavan during the Bhoomi Puja of development works. esakal
नाशिक

Nashik: सिन्नरच्या दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी मदत करणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सूतोवाच

पिंपरवाडी (यशवंत नगर) ग्रामपंचायतींतर्गत विकासकामांसाठी ६० लाखांचा निधी मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल व त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

पिंपरवाडी (यशवंत नगर) ग्रामपंचायतींतर्गत विकासकामांसाठी ६० लाखांचा निधी मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून मिळाला आहे. विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (ता. १४) झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Will give all possible help to Sinnar drought relief PWD Minister Ravindra Chavan prediction Nashik)

मंत्री चव्हाण म्हणाले, की पिंपरवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली विकासकामे खरेतर अगदी किरकोळ आहेत. मात्र, मंत्री म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी मी महत्त्वाची मानली.

वावी पंचक्रोशीतील समस्या सोडविण्यासाठी मंत्रिपदाच्या पलीकडे जाऊन मदत करण्याची आपली तयारी आहे. सिन्नर तालुक्यात असणारी दुष्काळी परिस्थिती विकासात अडसर निर्माण करणारी आहे.

त्यामुळे भविष्यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व त्यांच्या सोबतीने दुष्काळ निवारणासाठी सरकार पातळीवर निश्चितच मदत केली जाईल.

सरपंच केशरबाई हाडोळे व त्यांच्या कुटुंबीयांशी असलेल्या व्यक्तिगत नात्यामुळे लहानशा गावात विकासकामांना निधी दिला आहे. भविष्यातही गावाच्या विकासासाठी आपले योगदान असेल, याकडे श्री. चव्हाण यांनी लक्ष वेधले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, नाशिकच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपाभियंता प्रवीण भोसले, शाखा अभियंता बाळासाहेब गिते, सागर मुंदडा, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, विठ्ठल राजेभोसले, भारत कोकाटे, विजय काटे, श्रीकृष्ण घुमरे, अशोक ताजने, ज्ञानेश्वर पांगरकर, सुनील शेळके, संजय शेळके, नीलेश जगताप, गणेश वेलजाळी, दीपक वेलजाळी, जालिंदर वाल्हेकर, काका वायकर, कन्हय्यालाल भुतडा, प्रशांत कर्पे, संतोष जोशी, सुनील काटे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी उपसरपंच गणेश गायकवाड, माजी सरपंच संजय गायकवाड, विजय गायकवाड, कैलास काकड, रतन हाडोळे, सोमनाथ हाडोळे, श्रावण गायकवाड, सौरभ सातभाई, नाना गायकवाड, दर्शन घेगडमल, समाधान गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT