RAPE woman.jpg
RAPE woman.jpg 
नाशिक

भयानक! गाढ झोपेत असताना "तिचे' तोंड दाबून घराबाहेर नेले...अन्..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/अभोणा : भौती (ता. कळवण) येथील महिलेवर एकाने बलात्कार केला, तर दोघांनी त्याला मदत केली. ही घटना मंगळवारी (ता. 18) घडली. या प्रकरणातील तीन संशयितांना येथील पोलिसांनी अटक केली.

असा घडला प्रकार...

पीडित महिलेने भौती गावात नवीन घर बांधले असून, त्यास दरवाजा नाही. महिलेचा पती डोन (ता. अहवा) येथे व मुलगा काठरे (ता. कळवण) येथे कामानिमित्त गेले होते. रात्री दोनच्या सुमारास चिंतामण चौधरी, श्‍यामू पवार व गोपीनाथ बहिरम यांनी झोपेत असलेल्या महिलेस तोंड दाबून घराबाहेर नेले. चिंतामण चौधरी याने महिलेवर बलात्कार केला व श्‍यामू पवार, गोपीनाथ बहिरम यांनी त्या महिलेस पकडून ठेवले. पीडित महिलेने जोरात हिसका देऊन तोंडावरील हात बाजूला करून मुलाच्या नावाने आरडाओरड केली. लहान मुलगा जागा होऊन बॅटरी घेऊन आतील खोलीत आला. बॅटरीच्या प्रकाशात तिघेही पळून गेले.

अभोणा पोलिसांची कारवाई 

महिलेने अभोणा पोलिस ठाण्यात तत्काळ संपर्क साधला. अभोण्याचे सहाय्यक निरीक्षक उमाकांत गायकवाड, उपनिरीक्षक दीपक बागूल, हवालदार उत्तम चौधरी, नामदेव कवर, संतोष चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पहाटे चारच्या सुमारास गावाशेजारील जंगलात लपून बसलेल्या तिघांना ताब्यात घेतले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT