woman molest by taxi diver.jpg
woman molest by taxi diver.jpg 
नाशिक

अमानुष! विवाहितेला लिफ्ट दिली अन् वाहनातच केला अत्याचार; अतिरक्तस्रावामुळे महिला रुग्णालयात दाखल

अजित देसाई

नाशिक / सिन्नर : शिर्डी महामार्गावरील एका गावात सदर महिला वाहनाच्या प्रतीक्षेत उभी होती. कौटुंबिक भांडणामुळे ती मुलासमावेत सिन्नरला नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान शिर्डीच्या बाजूने येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाने या महिलेला लिफ्ट देत सिन्नरपर्यंत सोडण्याची तयारी दाखवली.पण त्यानंतर जे घडल ते अमानुष कृत्य होतं

असा घडला प्रकार

बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शिर्डी महामार्गावरील एका गावात सदर महिला वाहनाच्या प्रतीक्षेत उभी होती. कौटुंबिक भांडणामुळे ती मुलासमावेत सिन्नरला नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान शिर्डीच्या बाजूने येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाने या महिलेला लिफ्ट देत सिन्नरपर्यंत सोडण्याची तयारी दाखवली. मात्र तिचा डोळा लागल्याने चालकाने टेम्पो सिन्नरला न थांबवता नाशिकच्या दिशेने पुढे नेला. मोहगावाच्या शिवारात आल्यावर महिलेला जाग आली. तिने पुढील एका धाब्यावर उतरवून देण्यास चालकाला सांगितले. मात्र, त्याने सोडण्यास नकार दिला व रस्त्याच्या कडेला निर्जंस्थळी वाहन थांबवत अत्याचार केल्याचे सदर महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

अत्याचारामुळे महिलेस अतिरक्तस्राव
आपला कार्यभाग साधल्यावर वाहनचालकाने टेम्पो माघारी फिरवत सिन्नरला बसस्थानक परिसरात या महिलेला उतरवून दिले व पसार झाला. त्याने केलेल्या अत्याचारामुळे महिलेस रक्तस्राव होत होता. तशा अवस्थेतच ती मुलासोबत बसस्थानकातील बँकेसमोर बसून होती. ही बाब तेथे वाहन घेण्यासाठी आलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महिलेस हटकले. मात्र त्यांना आपबिती सांगण्याचे टाळत या महिलेने उशीर झाल्याने इथे थांबल्याचे सांगितले.अंधार पडून लागल्याने एका
कार्यकर्त्याने सिन्नर पोलीस ठाण्यात फोन वरून माहिती देत मदत पाठवण्याची विंनती केली, परंतु अर्धा तास उलटूनही एकही पोलीस बसस्थानकाकडे फिरकला नाही.

डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले.

या कार्यकर्त्यांनी सदर महिलेस शहरात कोणी नातेवाईक आहेत काय याबाबत विचारले. तिच्या एका नातेवाईकास बसस्थानकावर बोलावून घेतल्यावर हे कार्यकते रवाना झाले. इकडे नातेवाईकाकडे आल्यावर महिलेने घरातील महिलेस आपबिती सांगितली. तिथे अंघोळ केल्यावर देखील रक्तस्राव थांबत नसल्याने नातेवाईकांनी रात्री उशिरा तिला शहरातील एका डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले. तेथून प्रारंभी सिन्नर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. आज सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या महिलेचा जबाब नोंदवून घेत अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. अतिरक्तस्राव झाल्याने सदर महिला खाजगी दवाखान्यात गेल्यावर ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर आज (ता.13) सदर महिलेच्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक पुणे महामार्गावरील मोह गावच्या शिवारात घडली घटना

शिर्डी महामार्गावरील एका गावातून पाच वर्षीय मुलासोबत सिन्नरला जाण्यासाठी निघालेल्या 35 वर्षीय विवाहितेला लिफ्ट देत आयशर टेम्पो चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.12) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील मोह गावच्या शिवारात घडली.

रिपोर्ट - अजित देसाई

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT