Motivational Story Of Women
Motivational Story Of Women esakal
नाशिक

Nashik Motivational Story : फुलांच्या माळविक्रीतून जयश्रीताईंनी उभा केला संसार

विजयकुमार इंगळे: सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. मनात आणलं तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. या आत्मविश्वासावर तिनं थेट नियतीलाच आव्हान दिलं. वैवाहिक आयुष्यात आलेल्या संकटातून वाट काढत असतानाच स्वतःमध्ये असलेल्या कलेच्या जोरावर आयुष्य बदलण्याची ताकद मनाशी बाळगली.

आयुष्याबद्दल नेहमीच तक्रारी करणाऱ्यांसाठी आलेल्या परिस्थितीवर मात करत स्वतःसह तीन मुलांचं भविष्य कसं घडवू शकतो? याचा जणू सारिपाटच घालवून दिलाय... आयुष्याची लढाई लढताना कष्ट जणू पाचवीलाच पूजलेलं...आयुष्यात आलेल्या वादळांना परतवून लावत असतानाच इतरांसाठी प्रेरणादायी ठरल्या त्या नाशिकच्या सिंहस्थनगरमधील अल्पशिक्षित जयश्रीताई महाले-माळी यांनी...! (Women Motivational Story Jayashreetai made a living by selling flowers Nashik News)

परिस्थितीमुळे जेमतेम नववी पास शिक्षण झालेल्या जयश्रीताई सुनील महाले-माळी यांच माहेर खानदेशातील एरंडोल येथील... वडील रमाकांत बळवंतराव महाले यांचे पत्नी विमलबाई यांच्यासह तीन मुले आणि दोन मुली असं मोठं कुटुंब... टेलरिंग व्यवसायातून कुटुंबाला आधार देताना रोजच्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जणू कलाच महाले कुटुंबाने अवगत करून घेतली होती.

कुटुंबाची आर्थिक घडी बसवतानाच जबाबदारी पार पाडत वडिलांनी जयश्रीताईंचे लवकर लग्न केल्याने शिक्षण अर्ध्यावरच सुटलं... सासर जळगाव शहरातील... सासरकडची परिस्थितीही जेमतेम... कुटुंबासाठी आधार म्हणून मायाताई यांच्यातील जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कमी शिक्षण असले तरी स्वतःमधील आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी जळगाव शहरातच औषध डिस्ट्रिब्यूटर्सकडे पाच वर्षे अल्पपगारावर नोकरी केली.

रोजचा दिवस पुढे सरकत असतानाच कुटुंबात मुलगी प्रियंका, सुजाता आणि जयेश या मुलांच्या निमित्ताने त्यांची जबाबदारी वाढली. जळगावमधील अस्थिर आयुष्य आणि मुलांच्या भावी करिअरसाठी त्यांनी थेट नाशिक गाठलं. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी गोळे कॉलनीत पुन्हा औषधांच्या डिस्ट्रिब्यूटर्सकडे नोकरी करायला सुरवात केली. मात्र मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा विचार केला.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

फुलांच्या माळांनी वेधले लक्ष

रोज गोळे कॉलनीत कामाला जात असतानाच दुकानातील पूजा जयश्रीताई करायच्या. दुकानात रोज येणाऱ्या फुलांची माळ बघून आपणच हा व्यवसाय का सुरू करू नये, असा विचार करत त्यांनी या व्यवसायाकडे आपला कल वाढवला. येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. गोळे कॉलनीत कामाला जातानाच रोज सकाळी उठून त्या गंगेवर जाऊन फुले विकत आणून माळा तयार करून सिडको परिसरात त्या घरोघरी विक्री करू लागल्या.

पाच माळांपासून सुरू झाला प्रवास

प्रारंभी माळा विक्रीला सुरवात करताना याच व्यवसायात जिद्दीने उभे राहायचे, असा विचार करत त्यांनी सुरवातीला पाच माळा तयार करून विकल्या. पहिल्याच दिवशी त्यांना या व्यवसायातून दोनशे रुपये नफा मिळाला. जयश्रीताई यांनी फुलमाळा तयार करण्याच्या व्यवसायातून उभे राहताना पेट्रोल पंपावर उभे राहून वाहनांसाठी फुलमाळा विक्री करताना स्वतःची ओळख उभी केलीय. नाशिकच्या सिंहस्थनगर परिसरातील महाले पेट्रोलपंपाजवळ सकाळी सातपासून त्या फूलमाळा विक्री करतात. या व्यवसायाला सुरवात करताना ५ माळा विकण्यापासून ते आज त्यांची उलाढाल हजारोंच्या घरात गेलीय. अतिशय कमी भांडवलात सुरू केलेल्या या व्यवसायात या पेट्रोलपंपाचे संचालक आणि कर्मचारी यांचेही त्यांना सहकार्य लाभत असते. कुटुंबासाठी भल्या पहाटे उठून पेट्रोलपंपाच्या बाहेर फुलांच्या माळा विक्री करणाऱ्या भगिनीला बघितल्यावर त्यांच्यातील जिद्दीचे वाहनचालकही कौतुक करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT