ventilator bed e-sakal
नाशिक

नाशिकमध्ये पीएम केअर फंडातल्या ६० व्हेंटिलेटरचे काम अर्धवट

पीएम केअर फंडातून (PM care fund) महापालिकेला प्राप्त झालेल्या ६० व्हेंटिलेटरचे (ventilator) काम अर्धवट स्थितीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विक्रांत मते

नाशिक : पीएम केअर फंडातून (PM care fund) महापालिकेला प्राप्त झालेल्या ६० व्हेंटिलेटरचे (ventilator) काम अर्धवट स्थितीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुटे भाग प्राप्त न होण्याबरोबरच व्हेंटिलेटर जोडणीचे काम थांबले आहे.

एकीकडे कोरोनाग्रस्त (corona virus) रुग्ण ऑक्सिजन (oxygen) बेडसाठी रुग्णालयांचे उंबरठे झिजवत असताना पीएम केअर फंडातून (PM care fund) महापालिकेला प्राप्त झालेले व्हेंटिलेटर अद्यापही जोडणी न झाल्याने पडून असल्याने संताप व्यक्त होत आहे. (work of 60 ventilators received by the Municipal Corporation from PM Care Fund is in partial condition)

जोडणीला साहित्य अपुरे

शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. सहा ते सातपटीने वाढणाऱ्या कोरोनामुळे नागरिक बेहाल झाले आहेत. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, बेड मिळाला तर ऑक्‍सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्शनदेखील मिळत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. त्यात वैद्यकीय विभागाच्या त्रुटी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात २३, तर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १७ असे एकूण ४० व्हेंटिलेटर बेड आहेत. यातील २५ व्हेंटिलेटर बेड गेल्या वर्षी महापालिकेला पीएम केअर फंडातून मिळाले होते. त्यानंतर मागील महिन्यात पीएम केअर फंडातून आणखी ६० नवीन व्हेंटिलेटर प्राप्त झाले. व्हेंटिलेटर यंत्र प्राप्त झाले, परंतु सुटे भाग अपुरे मिळाल्याने अडचण निर्माण झाली आहे. कनेक्टर (connector), ट्युबीन (tubing) आदी सुटे साहित्य प्राप्त न झाल्याने व्हेंटिलेटरची जोडणी थांबल्याचा दावा वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या जोडणीसाठी तंत्रज्ञ उपलब्ध होत नसल्याची बाबदेखील समोर आली आहे.

चार व्हेंटिलेटर वर्षभरापासून नादुरुस्त

मागील वर्षी पीएम केअर फंडातून महापालिकेला ३५ व्हेंटिलेटर प्राप्त झाली होती, त्यातील ३१ सुरू करण्यात महापालिकेला यश आले. परंतु बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील प्रत्येकी दोन, असे चार व्हेंटिलेटर अद्यापही नादुरुस्त आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सीटी स्कॅन मशिन खरेदी केले होते. तंत्रज्ञ उपलब्ध होत नसल्याने पडून होते. रविवारी तंत्रज्ञ उपलब्ध झाल्यानंतर यंत्र सुरू झाले आहे. आता व्हेंटिलेटर जोडणीचा मुद्दा समोर आल्याने कोरोना आपत्तीच्या परिस्थितीत तातडीने या महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

''पीएम केअर फंडातून महापालिकेला नव्याने साठ व्हेंटिलेटर मिळाली आहे, परंतु व्हेंटिलेटरचे सुटे भाग न मिळाल्याने जोडणीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. सुटे भाग तातडीने मिळण्यासाठी शासनाकडे महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे.''

-डॉ. आवेश पलोड, कोरोना नियंत्रणप्रमुख, महापालिका, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT