pratham.jpg
pratham.jpg 
नाशिक

जिद्दीला सलाम! दिवसा 'डिलिव्हरी बॉय'चे काम अन् रात्री अभ्यास...बारावीत 'प्रथम'ने मिळवलं घवघवीत यश

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (म्हसरूळ) ऐन परीक्षेच्या काळात एका दुर्धर आजाराने पितृछत्र हरपले..अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली..मात्र अशाही परिस्थितीत 'तो' डगमगला नाही..त्याने 'त्या' गोष्टीचे भांडवलही केले नाही.. 'तो' आणखी जिद्दीने पेटून उठला...सोबत त्याने 'उबेर इट'मध्ये 'डिलिव्हरी बॉय'चे कामही केले...कुटुंबाला आर्थिक हातभार लावता लावता 'त्या'ने बारावीच्या परीक्षेत चक्क 80 टक्के गुण मिळवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला, तेदेखील कुठल्याही क्लासशिवाय...

कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी प्रथमवरच... 

प्रतिकूल परिस्थितीतही उत्तुंग यशाला गवसणी घालणाऱ्या पंचवटीतील आरटीओ लिंक रोडवरील या अठरा वर्षीय युवकाचे नाव आहे प्रथम सुनील कोठारी...प्रथम हा बीवायके कॉलेज येथे वाणिज्य शाखेत बारावीत शिक्षण घेत होता. सर्वसाधारण वर्षभरापूर्वी वडील सुनील हे कॅन्सरग्रस्त झाले आणि अवघ्या दोन महिन्यांत त्यांचे देहावसान झाले. प्रथम याचे बारावीचे शिक्षण सुरु होते. अचानकपणे त्याचे पितृछत्र हरपल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला होता. बहीण मोठी असली तरी तिचेही इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू होते. त्यामुळे कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी प्रथमवरच आली. परंतु प्रथमने न डगमगता आलेल्या परिस्थितीला मोठ्या धैर्याने सामोरे जाण्याचे ठरवले. आई आणि बहिणीला धीर देत त्याने कुटुंबाचा गाडा हाती घेतला. सर्वप्रथम त्याने काम शोधले. त्याला कामही करायचे होते आणि शिक्षणही. म्हणून त्याने पार्ट टाइम कामाला प्राधान्य दिले. 

'डिलिव्हरी बॉय'चे काम केले..

'उबेर इट' या कंपनीत 'डिलिव्हरी बॉय' म्हणून कामाला सुरुवात केली. काम करत करत अभ्यासही सुरु ठेवला. वाणिज्य शाखेत असल्याने क्लासची अत्यंत गरज होती. मात्र परिस्थितीमुळे क्लास लावणे त्याला परवडणारे नव्हते. त्याने 'सेल्फस्टडी'वर भर दिला. दिवसभर काम आणि रात्री, पहाटे अभ्यास करत अखेर त्याने बारावीची मुख्य परीक्षा दिली. नुकताच निकाल लागला आणि प्रथमने तब्बल 80 टक्के गुण मिळवून वडिलांना अनोखी आदरांजली अर्पण केली. उराशी जिद्द बाळगली की, समोर कितीही मोठे संकट असले, परिस्थिती कितीही बिकट असली तरी खंबीरपणे त्याला सामोरे गेल्यावर यश मिळतेच, हेच 'प्रथम'ने दाखवून दिले आहे.

शिक्षण घेत असताना आई व बहिणीचे तसेच नातेवाईक आणि शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. पुढे काम करूनच पदवी शिक्षण पूर्ण करून एम बी ए करायचे आहे. - प्रथम कोठारी  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT