World Mental Health Day esakal
नाशिक

World Mental Health Day : कोरोनानंतर मानसिक आजारांत 25 टक्‍यांपर्यंत वाढ

जागतिक मानसिक आरोग्‍य दिन : दहापैकी पाचजण ग्रस्त : वेळीच उपचाराची गरज

अरुण मलाणी

नाशिक : तणाव, अस्‍वस्‍थता, चिंता, भयगंड, स्किझोफ्रेनिया यांसारख्या विविध मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना साथीनंतर मानसिक आजारांच्‍या रुग्‍णांमध्ये तब्‍बल २५ टक्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे दर दहापैकी पाच ते सहा जण मानसिक आजारांचे शिकार होत आहेत. याबाबत जागरूकता निर्माण करताना वेळीच या आजारावर उपचार करुन घेण्याची आवश्‍यकता मानसोपचार तज्‍ज्ञांकडून व्‍यक्‍त होत आहे.

‘मानसिक आरोग्‍य आणि मानसिक स्‍वास्‍थ जागतिक स्‍तरावर प्राधान्‍याचा विषय बनविणे’ अशी यंदाच्‍या जागतिक मानसिक आरोग्‍य दिनाची संकल्‍पना आहे. ही संकल्‍पना निवडण्याचे महत्त्वाचे कारण म्‍हणजे अद्यापही समाजात मानसिक आजारांबाबत तितकी सजगता दिसून येत नाही. शरीरात काही दुखले तर त्‍यावर लगेच उपचार घेतला जातो. परंतु तुलनेत बहुतांश वेळा मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे सौम्‍य स्वरूपाच्या मानसिक आजारांचे रूपांतर गंभीर आजारांमध्ये होत असल्‍याचे डॉक्‍टरांचे निरीक्षण आहे. औषधोपचार व सोबत कॉग्‍निटीव्‍ह बिहेव्‍हीयरल थेरपी व यांसारख्या थेरपी आणि समुपदेशन आदी उपचार आहेत.

मानसिक आजारांचे प्रमाण (प्रति शंभर लोकसंख्येमागे)

  • तणाव (डिप्रेशन) : १५

  • चिंतारोग (एन्‍झायटी) : २५

  • व्‍यसनाधीनता (ॲडिक्‍शन) : ३०

  • लैंगिक समस्‍यांबाबत विकार : ३० ते ४०

  • स्किझोफ्रेनिया : १ ते २

  • निद्रानाश, झोपेशी निगडित समस्‍या : ३५ ते ४०

  • ऑब्‍सेसिव्‍ह कम्‍पल्‍सीव्‍ह डिसऑर्डर : ५

  • बायपोलर ऑफेंसिव्‍ह डिसऑर्डर : २

मानसिक आरोग्‍यासाठी हे करा

  • नियमितपणे ध्यान, योगासने करावीत

  • मित्र, कुटुंबीयांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवावा.

  • छंद जोपासावेत, दिवसभरातील काही वेळ छंदांसाठी द्या.

  • सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्‍यक असते

  • निसर्गाच्‍या सानिध्यात वेळ घालवावा

कोरोनानंतर मानसिक आजारांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून, यासंदर्भात आणखी जागरूकता वाढली पाहिजे. बहुतांश मानसिक आजार योग्‍य उपचारातून पूर्णपणे बरे हाऊ शकतात. सौम्‍य ते गंभीर स्वरूपाच्या आजारांवर वेळीच व पूर्ण उपचार घेऊन सामान्‍य जीवन जगता येऊ शकते.

-डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्‍ज्ञ

गीतेमध्ये (६.६) भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की नियंत्रित मन माणसाचे चांगले मित्र होऊ शकते व अनियंत्रित मन त्याचे शत्रू असते. मानसिक स्वास्थ्यासाठी मनावर नियंत्रण करणे शिकावे लागेल. समर्थ रामदास स्वामी म्हणत, ‘ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले’. मनावर नियंत्रण करण्यासाठी मंत्रजप, प्राणायाम, ध्यान, सेवा हे सर्वोत्तम उपाय आहेत.

-कृष्णधन प्रभू, अध्यक्ष, इस्‍कॉन नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT